NCP MLA Meet Sharad Pawar
NCP MLA Meet Sharad PawarSarkarnama

NCP MLA Meet Sharad Pawar: जयंत पाटील येईपर्यंत पवारांनी अजितदादांसह नऊ मंत्र्यांना ताटकळत ठेवले

Ncp Crisis: जयंत पाटील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येईपर्यंत अजित पवारांच्या मंत्र्यांना शरद पवारांनी वाट पाहायला भाग पाडले.
Published on

Political News: राष्ट्रवादीसोबत फारकत घेऊन सत्तेत जाऊन पंधरवडा झाला नसतानाच पक्षाध्यक्ष शरद पवारांकडे दोनदा चकरा मारणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येईपर्यंत ताटकळतच ठेवले. त्यामुळे जयंत पाटलांना बडवे म्हणणाऱ्या साऱ्याजणांना त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसावे लागले. या निमित्ताने शरद पवारांनी फुटीरांना जयंत पाटलांचे 'वजन'ही दाखविले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर तुटून पडले. त्यात अजित पवारांच्या नेत्यांनी जयंत पाटलांवर जहरी टीका करत आपला रोष दाखवला. मात्र, शरद पवार हे जयंत पाटलांच्या बाजूने भक्कम राहिले.

फुटलेल्या नेत्यांनी जयंत पाटलांचा केलेला पाणउतारा पवारांच्या मनात होता. हे हेरूनच सोमवारी दुपारी पुन्हा भेटण्यासाठी आलेल्या फुटीर नेत्यांना जयंत पाटील येईपर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वाट पाहायला भाग पाडले.

NCP MLA Meet Sharad Pawar
NCP NEWS : राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळे की अजित पवारांकडे असावं?; खासदार कोल्हेंनी दिले हे उत्तर....

अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आणि पहिल्या दिवशी अजित पवारांसह त्यांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला आले. याआधीच्या भेटीत पवार सेंटरमध्ये होते. मात्र, दुसऱ्या भेटीला पवार नसतानाच अजित पवार आणि इतर नेते सेंटरमध्ये आले. तेथील गर्दी पाहून खुद्द पवारही अवाक झाले.

अजित पवार आणि त्यांचे नेते भेटायला आल्याचे कळताच जयंत पाटलांना फोन केला आणि सेंटरमध्ये बोलावून घेतले. पक्षाच्या अन्य बैठकीत असलेल्या पाटलांना सेंटरमध्ये पोहचण्यास वेळ लागला. तो पर्यंत अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांना मिटींग रूममध्ये बसून ठेवले. त्यातून जयंत पाटलांचे स्थान पक्षात आजही मजबूत असल्याचे शरद पवारांनी फुटलेल्या नेत्यांना दाखवून दिले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com