NCP NEWS : राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळे की अजित पवारांकडे असावं?; खासदार कोल्हेंनी दिले हे उत्तर....

महाराष्ट्रासाठी शरद पवारांनी काय केलं?ज्यांनी हे सर्व केले आहे, त्यांना आपण असं विचारणार का?
Supriya Sule-Amol Kolhe- Ajit Pawar
Supriya Sule-Amol Kolhe- Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार यांनी आपला सवतासुभा उभा केला आहे. त्यात अजित पवारांकडे ३५ ते ४० आमदार, तर शरद पवार गटाकडे १४ ते १९ आमदार असल्याचा असल्याचा दावा केला जातो. शरद पवार गटाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना ‘ राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवारांकडे असावे की सुप्रिया सुळे यांच्याकडे ’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर कोल्हे यांनी शरद पवार असे दिलं. तसेच भाजप प्रवेशाबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. (Leadership of NCP should be with Supriya Sule or Ajit Pawar; MP Kolhe gave this answer...)

एका खासगी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले होते. आपल्या मिश्किल शैलीने त्यावर भाष्य केले.

Supriya Sule-Amol Kolhe- Ajit Pawar
Barshi News : बार्शी मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा;फडणवीस समर्थक आमदाराच्या अडचणी वाढणार

खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार यावर खूप लोक पैज लावतात. अगदी लहान मुलंसुद्धा ठामपणे सांगतात की कोल्हे यांचा एक पाय भाजपमध्ये आहे. यावर खासदार कोल्हे यांनी भन्नाट उत्तर दिले. ते म्हणाले की मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे, त्यामुळे उगं नांगर खांद्यावर घेऊन चालत नाही. आधी आभाळ बघून मग जमीन कधी नांगरायची ते ठरवावं लागतं. (त्यांनी आपलं खरं उत्तर दिलं आहे. पण कार्यक्रमाचा प्रोमो असल्यामुळे ते येथे देता येऊ शकले नाही.)

Supriya Sule-Amol Kolhe- Ajit Pawar
Maharashtra Politic's : राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची पवारांना विनंती; पण त्यांच्या मनात काय?, हे आज कसं सांगू; शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांची प्रतिक्रिया

जातीचं राजकारण हे शरद पवार (Sharad Pawar) यांनी महराष्ट्रात आणलं, असं राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावरही कोल्हे यांनी उदाहरणं देत उत्तर दिलं. ते म्हणाले की जेव्हा शरद पवारांनी महिलांना प्रथम आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी ती महिला कुठल्या जातीची आहे, याचा विचार करून निर्णय घेतला नव्हता. हिंजवडी आयटी पार्क आणणाऱ्या शरद पवारांना तेथेच काम करणारा अधिकारी विचारतो, महाराष्ट्रासाठी शरद पवारांनी काय केलं?ज्यांनी हे सर्व केले आहे, त्यांना आपण असं विचारणार का?

Supriya Sule-Amol Kolhe- Ajit Pawar
Vidhan Parishad News : ‘कोर्ट नको, ते सोपं आहे, तुम्हाला’; नीलम गोऱ्हेंच्या सभापतिपदावरून फडणवीस-जयंत पाटील भिडले

डोकेदुखीची गोळी कोणाला पाठविणार असं जेव्हा त्यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस असं उत्तर दिलं. तसेच स्मरणशक्तीची गोळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवेन. कारण, त्यांनी दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं सांगितलं होतं. त्यामुळे ती गोळी मोदींना जाणे गरजेची आहे, असेही गंभीरपणे सांगितले. अमोल कोल्हे यांनी यावेळी लोकशाहीला फोन करत आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com