Sharad Pawar On Amit Shah : 'तडीपार झालेली अन् नोंद घ्यावी, अशी ती व्यक्ती नाही'; शरद पवारांनी अमित शाहांच्या वर्मी घाव घातला

Sharad Pawar Amit Shah BJP MahaVijay Shirdi Mumbai : शिर्डी इथल्या महाविजय अधिवेशनात भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले.
Sharad Pawar 1
Sharad Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शरद पवार यांनी मुंबई इथं आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं.

"देशातील गृहमंत्रीपदावर काम केलेल्या दिग्गज नेत्यांची, जनसंघातील नेत्यांची नाव घेत, यातील कोणालाही तडीपार केलेलं नव्हतं. मला टीका जिव्हारी लागलेली नाही. पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी, अशी ती व्यक्ती नाही", असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शिर्डी भाजपचे महाविजय अधिवेशन झाले. भाजप (BJP) नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिवेशनात महाविकास आघाडीतील काँग्रेससह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या परिवारवादावर जोरदार हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर आता शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, अमित शाहांच्या वर्मी घाव घातला.

Sharad Pawar 1
Sharad Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर कोण निर्णय घेणार? शरद पवारांनी थेट सांगून टाकलं

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "मला टीका जिव्हारी लागली नाही, पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी,अशी ती व्यक्ती नाही. देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगल काम केलेलं आहे. पण या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं". देशाच्या गृहमंत्र्यांनी माझ्याविषयी काही विधान करताना, माहिती घेऊन करायला पाहिजे होती, असे सांगून 1978 मध्ये मुख्यमंत्री असताना, जनसंघाबरोबर कामं केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar 1
Top 10 News : कुंभमेळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचं निधन, बीडमध्ये जमावबंदी- महत्त्वाच्या घडामोडी वाचा

शरद पवार म्हणाले, "मी 1958 पासून राजकारणात प्रशासनात आहे. मी 1978 साली राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी हे राजकारणात कुठे होते, हे मला माहीत नाही. मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासारखे कर्तृत्वान लोक होते". जनसंघाची पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक लोकांनी त्यावेळी माझ्यासोबत काम केले. वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी देखील मदत केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. भुजमध्ये भूकंप झाला होता, त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी मी विरोधी पक्षात असताना देखील मला एका समितीवर नेमलं होतं. सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली होती.

बाळासाहेबांच्या मदतीची आठवण करून दिली...

'अमित शाह यांच्या तडीपार काळातील आठवण असताना, ते गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, त्यावेळी सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबात केलेलं वक्तव्य भाजप किती गांभीर्यानं घेईल?', असा सवाल शरद पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com