अजीर्ण होईल इतका ''पाहुणचार'' घेऊ नका, पवारांचा तपास यंत्रणेला खोचक टोला

''पाहुणचार'' घ्यावा, पण अजीर्ण होईल, इतका घेऊ नये,'' अशी खोचक टीका शरद पवारांनी (Sharad Pawar) यावेळी तपास यंत्रणेवर केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) तीन दिवसापूर्वी छापेमारी केली होती. याबाबत अजित पवार यांनी त्यावेली सांगितले होते की प्राप्तिकर विभागाचे अधिकारी 'पाहुणचार' घेत आहेत. ते गेल्यावर याविषयी या कारवाईबाबत बोलेन. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ''पाहुणचार'' घ्यावा, पण अजीर्ण होईल, इतका घेऊ नये,'' अशी खोचक टीका पवारांनी यावेळी तपास यंत्रणेवर केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ''अजित पवार यांचे याबाबतचे स्टेटमेंट मी वाचलं. त्या तिन्ही मुलींचा कोणताही कारखाना नाही. पण तरीही तपास यंत्रणा त्यांची चैाकशी करीत आहेत. एक ते दीड दिवसात चैाकशी संपली असती. पण पाच- सहा दिवस ही चैाकशी सुरु आहे. संबधीत तपास यंत्रणेला याबाबत फोन येत होते. त्यांना सांगण्यात येते होते की चैाकशी थांबवू नका, त्यांना सोडू नका. कोल्हापुरात तर लहान घरात अठरा अधिकारी चैाकशी करीत होते. एवढे अधिकारी तपास करतात, हे कधी पाहिलं नव्हतं. केंद्र सरकारबाबत आपल्या बाबत खूप आस्था आहे, तेव्हा काळजी घ्या, अशी सूचना मी दिली. ''

Sharad Pawar
मावळ घटनेवरुन फडणवीसांना पवारांचे प्रत्युत्तर

''सत्तेचा गैरवापर करुन केंद्र सरकार महाविकास आघाडीला टार्गेट करीत आहेत. महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आघाडी सरकारमधील नेत्यांना नाउमेद करण्याची स्टे्टजी आहे. पण याची चिंता आम्ही करीत नाही,'' असे शरद पवार म्हणाले.

''लखीमपूर खीरी हिंसाचारात मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलं. यात शेतकऱ्यांनी हत्या झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने यात भूमिका घेणे गरजेचे होते. पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. याप्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा देणे गरजेचे होते. पण उत्तर प्रदेश सरकारला अद्यापही याबाबत मैान आहे. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टाळता येणार नाही, असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

लखीमपूर खीरी प्रकरणावरुन (Lakhimpur Khiri Violence) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याला पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले, ''मावळ येथील घटनेला कुठलाही राजकीय पक्ष जबाबदार नव्हता, तर या घटनेला पोलिस जबाब होते. येथील स्थानिक भाजपच्या नेत्यांना याबाबत चिथावणी दिल्याने हा प्रकार झाला होता. त्यानंतर मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळे तिथं भाजपच्या उमेदवारांना टाळले. तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला,''

शरद पवार म्हणाले की, चीनसोबत १३ बैठका झाल्या पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणे महत्वाचे आहे. केंद्राकडून काही यंत्रणाचा सतत गैरवापर केला जात आहे. केद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com