Sharad Pawar On Chess : बुद्धिबळ गमतीने खेळतो, अन् वजीर आवडतो; शरद पवारांनी सांगितलं कारण

Supriya Sule : आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांनी या मुद्द्यावर दोन वेगळ्या भूमिका घेतल्या आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : देशातील ज्येष्ठ नेते शरदर राजकीय पटातील सर्व डावपेच जाणून आहेत. त्यांनी विरोधकांच्या अनेक सापळ्यांना सडेतोड उत्तरे देत आपले राजकारण एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळेच त्यांची तेल लावलेला पैलवान अशी ओळख झालेली आहे.

राजकारणी असलेल्या पवारांना बुद्धिबळ हा खेळ सर्वात जास्त आवडतो, असे म्हणतात. त्यावर बोलताना त्यांनी बुद्धिबळातील आवडत्या सैनिकाबद्दलही वर्णन केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.

बाप-लेकीच्या या मुलाखतीत पवारांनी आणि सुळेंनी Supriya Sule राजकारणा पलिकडच्या विचारलेल्या सर्व प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. आपल्या भूमिका स्पष्ट करताना त्यांनी जुना आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी त्यांना राजकीयपटाला अनुसरून असलेल्या बुद्धिबळ खेळाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. बुद्धिबळाचा राजकारण फायदा होतो, असे सांगताना पवारांनी त्यांना पटातील वजीर खूप आवडीचा सैनिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांनी Sharad Pawar, मी बुद्धिबळ चांगला खेळतो, असे अनेकांना वाटते, मात्र तसे काही नाही. वेळ मिळेल त्यावेळी गंमत म्हणून कधीतरी बुद्धिबळ खेळायला बसतो. या पटातील उंट तिरका चालतो. राजकारणात उंट कोण आहे, याकडे लक्ष द्यावे लागते. तर घोडा हा अडीच घरे चालतो. असा आपल्या बाजून कोणता घोडा आहे का, हेही पाहावे लागेत. यानंतर तुम्हाला कोणता सैनिक आवडतो, असा प्रश्न करण्यात आला. त्यावर पवारांनी मला सर्व दिशेना चालणारा वजीर आवडतो, असे स्पष्टपणे सांगितले.

Sharad Pawar
Udayanraje : उदयनराजेंनी दिल्लीतून मराठा, ओबीसी नेत्यांना फटकारलं; म्हणाले, आरक्षणाचं राजकारण...

असं ठरलं सुप्रिया सुळेंचं लग्न

शरद पवार यांनी आपला जावाई कसा शोधला आणि सुप्रिया सुळेंच्या विवाहात त्यांची भूमिका काय होती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, सुप्रिया सुळेंच्या लग्नासाठी बाळासाहेब ठाकरे आणि माधव आपटे आदी जवळच्या मित्रांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी सदानंद सुळेंचे स्थळ सूचवले होते. त्यानंतर ते दोघे भटले आणि त्यांनीच लग्न ठरवले, असेही पवारांनी सांगितले.

आरक्षणाबाबतचं मत

राज्यात सध्या आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज समोरासमोर आला आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर छेडले असता पवार म्हणाले, आरक्षणावरून आज राज्यात दोन गट पडले असून ते दुर्दैव आहे. त्या गटांना कुणीतरी खतपाणी घालत आहे.

आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांनी या मुद्द्यावर दोन वेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. एका गटाने ओबीसी तर दुसऱ्या गटाने मराठ समाजाची बाजू घेतल्याचे दिसून येते. तसे न करता सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे होते. त्यासाठी संवाद घडवून आणणे आवश्यक आहे, असेही पवारांनी सूचवले.

Sharad Pawar
BJP Vs Mamata Banerjee : 'ममता बॅनर्जींना बनायचंय पंतप्रधान, म्हणूनच तर..' ; भाजपने लगावला टोला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com