Sharad Pawar News : लेकीसाठी 8 धैर्यशील 6 अन् लाडक्या शशिकांतभाऊंसाठी 5 सभा, पवारांचा झंझावात!

Lok Sabha Election 2024 : शरद पवार अवघ्या 22 दिवसांत राज्यभरात तब्बल 50 सभा घेऊन बंडखोरांसह भाजपला धडा शिकवण्याचा विडाच उचलल्याचे दिसून येत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Maharashtra Political News : बारामतीची जागा जिंकून म्हणजे, सुप्रिया सुळेंना हरवून ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राजकारणाला 'ब्रेक' लावण्याच्या इराद्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. त्यातून बारामतीच्या प्रचारात भाजपची फौज, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांकडच्या डझनावारी नेते, मंत्र्यांच्या सभा लावण्याचे नियोजन आहे. त्यामुळेच बारामतीची निवडणूक सुळेंसाठी सोपी राहणार का, याकडे बोट दाखवले जात आहे. मात्र, विरोधकांच्या साऱ्या खेळ्या हाणून पाडण्यासाठी पवारसाहेबही तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरणार आहेत. Sharad Pawar fight with Mahashkti in Maharashtra.

शरद पवारांचे Sharad Pawar राज्यभरात चार डझनापेक्षा अधिक सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यातील आठ सभा या आपली लेक सुप्रिया सुळेंसाठी घेणार आहेत. दुसरीकडे, भाजपला धूळ चारण्याची खेळी केलेल्या पवारांनी स्वपक्षात आणलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांसाठी ते पाच वेळा फिरून माढा पिंजून काढणार असल्याचे दिसत आहेत. याच रणधुमाळीत साताऱ्यात उदयनराजेंचा दुसऱ्या पराभवासाठीही लाडक्या शशिकांत शिंदेंच्या प्रचारात पवारसाहेब पाच सभा घेतील. त्यामुळे या तीन मतदारसंघांत पवारांच्या सभांचा झंझावात राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन बरोबर महिना उलटला आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याने शरद पवार - उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याच धर्तीवर पवार आपल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी आकाश - पाताळ एक करणार असल्याचे दिसून येत आहे.

Sharad Pawar
Maval Lok Sabha Constituency : रावणाची उपमा देत श्रीरंग बारणेंवर निशाणा; संजोग वाघेरे नेमके काय म्हणाले?

शरद पवारांनी आपल्या उमेदवारांसाठी पाच दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावणार आहेत. ठिकठिकाणी ते एक एक पत्ते जोडत समोरच्या उमेदवाराविरोधात कडी करण्यास सुरुवात केली आहे. बारामतीसह इतर मतदारसंघात अजित पवारांच्या Ajit Pawar निकटवर्तींयांसह भाजप, शिवसेनेत नाराजांना आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यासह पवार सभांचाही धडाका लावून विरोधकांना धडकी भरवणार आहेत. त्यांनी अवघ्या 22 दिवसांत राज्यभरात तब्बल 50 सभा घेऊन बंडखोरांसह भाजपला धडा शिकवण्याचा विडाच उचलल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sharad Pawar
Sunetra Pawar : शरद पवार, अजितदादांच्या समर्थकांसाठी 'गुड न्यूज'; पण इलेक्शननंतर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com