Sharad Pawar: अदानींच्या घरी शहांसोबत झालेल्या भेटीबाबत शरद पवारांनी सगळंच सांगितलं....

Sharad Pawar Meet Amit Shah & Gautam Adani: अदानी यांची महाराष्ट्रात मोठी गुंतवणुक आहे. मी मुख्यमंत्री असताना गोंदिया आणि भंडारा येथे त्यांचे मोठे प्रकल्प सुरु होते. त्यांचे उद्धघाटन मीच केले होते.
Sharad Pawar | Ajit Pawar | Gautam Adani
Sharad Pawar | Ajit Pawar | Gautam AdaniSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मी शरद पवार यांच्या समंतीनेच पहाटेचा शपथविधीला गेलो होतो, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. अजितदादांचा हा दावा शरद पवार यांनी खोडून काढला आहे. साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवारांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. उद्योगपती गौतम अदानी, अमित शाह यांची आपली भेट कधी झाली, याबाबत शरद पवारांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यातील पहाटेच्या शपथविधीपूर्वी तुम्ही गौतम अदानी आणि अमित शाह यांना भेटला होता का? या प्रश्नांवर शरद पवार म्हणाले, "असं काही केले असते तर त्याप्रमाणे सरकार पाहायला मिळाले असते. सरकार स्थापन झालंच नाही तर अशा प्रश्नांना आणि चर्चांना अर्थ नाही. पण ही गोष्ट खरी आहे की, निवडणुका आणि तो कालावधी सोडल्यानंतर कधीकाळी मी केंद्रातील मंत्री असो कि उद्योजक असो मी भेटत नाही, असे मी म्हणणार नाही. हे खरं आहे की मी अनेक वेळा अजित पवार यांना घेऊन त्यांना माहिती व्हावी म्हणून उद्योगपतींना भेटलो आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना मी तीन-चार वेळा भेटलो आहे. महाराष्ट्राचे काही प्रश्न, ऊसाचे काही प्रश्न असताना मी गृहमंत्र्यांना भेटलो आहे," असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar | Ajit Pawar | Gautam Adani
Sharad Pawar : शिवसेना पहिल्यांदा कुणी फोडली? भुजबळांच्या दाव्यानंतर पवारांकडून ‘एक घाव दोन तुकडे’

मी सार्वजनिक जीवनात काम करतो, संसदेचा सभासद आहे, राज्याचे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांतून मार्ग काढायचे असतात, अशा वेळी निर्णय घेणारे जे घडत असतात, ज्यांना भेटणे गरजेचे असते. अशा व्यक्तींना भेटणं म्हणजे काहीतरी कटकारस्थानच करत असेल, असे म्हणणे योग्य नाही.

Sharad Pawar | Ajit Pawar | Gautam Adani
Rohit Pawar: पहाटेच्या शपथविधी, अदानींना विचारा काय घडलं? निवडणूक जिंकण्यासाठी अजितदादांचा हा केविलवाणा प्रयत्न!

मी अनेक उद्योगपतींना भेटत असतो, रतन टाटा, किर्लोस्कर यांच्या घरी मी अनेक वेळा गेलो आहे. आजही जात असतो. अदानी यांची महाराष्ट्रात मोठी गुंतवणुक आहे. मी मुख्यमंत्री असताना गोंदिया आणि भंडारा येथे त्यांचे मोठे प्रकल्प सुरु होते. त्यांचे उद्धघाटन मीच केले होते. त्या ठिकाणी कोळशाच्या खाणी होत्या. केंद्र सरकारने त्यांना ते काम दिले होते. महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्रात जे मोठे काम करु इच्छितात, त्या कामांना गती देणे , त्यांच्याशी संवाद साधणं, या बाबी गरजेच्या असतात, असे पवार म्हणाले.

शिवसेनाही ही पहिल्यांदा शरद पवारांमुळेच फुटली. माझ्यात शिवसेना फोडण्याची ताकद नव्हती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता.त्यावर पवार म्हणाले, " मी त्यावेळी कोणत्या पक्षात होतो? मी शिवसेनेत नव्हतो. माझी जबाबदारी काय? माझ्या विरोधी पक्षाला शक्ती द्यायचं काम माझं आहे की त्यांना कमकुवत करायचं काम? मला आमचा पक्ष मजबूत करायचा असेल तर त्या पक्षाला कमजोर करणाऱ्या ज्या शक्ती, संघटना आहेत त्यांच्यावर आमचा आघात राहणार. आपली शक्ती वाढेल कशी याची खबरदारी मी घेणार,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com