
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार गेल्या 60 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून 55 वर्षांहून अधिक काळ ते संसदीय राजकारणात आहेत. एवढ्या मोठ्या राजकीय कार्यकाळात त्यांच्या जबाबदाऱ्या संभाळणारे अनेक स्वीय सहायकगेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत.
परंतु गेल्या 42 वर्षांपासून शरद पवारांचे स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या तुकाराम धुवाळी यांचे आज निधन झाले. आपल्यासोबत 42 वर्षे सोबती राहिलेल्या, प्रत्येक क्षणात साथी बनलेल्या तुकाराम धुवाळी यांच्या निधनाबद्दल शरद पवारांनी दु:ख व्यक्त करत आठवणी जागवल्या आहेत.
शरद पवारांसोबत 1972 पासून सावलीसारख्या राहणाऱ्या स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचं निधन झालं आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी होते. तुकाराम धुवाळी यांच्या निधनानं कुटुंबातीलच एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तुकाराम धुवाळी यांच्या निधनाचं वृत्त समजताच शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शरद पवार यांनी धुमाळी यांच्या आठवणीत फेसबुकवर (FaceBook) पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटलं आहे की, "मी 1972 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी आणि ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली".
तुकाराम धुमाळी यांच्यावर असलेल्या विश्वास दाखवताना, अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसेच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं याचं मला अत्यंतिक दु:ख होतंय असं शरद पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कामाच्या व्यापात, अशी काही माणसं जवळ, असावी लागतात की, ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही. अशातीलच तुकाराम धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतं आहे, असे भावूक उद्गार देखील शरद पवारांनी त्यांच्या आठवणीत काढले.
वयाच्या 27 व्या वर्षी शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले. विधानसभेत पोचले. 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद, देशाचं संरक्षणमंत्री, कृषिमंत्री यासारखी पदे भूषवली. या काळात शरद पवारांच्या सोबत स्वीय सहाय्यक म्हणून राहिलेल्या तुकाराम धुवाळी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून काम केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.