Mumbai APMC : एकनाथ शिंदेंची 'गज चाल'; आशियातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भगवा फडकवण्याची तयारी

DCM Eknath Shinde ShivSena election Chairman Deputy Chairman Mumbai Agricultural Produce Market Committee : आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी निवडणूक होत आहे.
DCM Eknath Shinde
DCM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यात 'Operation Tiger' सुरू आहे. या मोहिमेतून शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू असतानाच, शिंदेंनी शिवसेनेची राजकीय ताकद वाढवण्यासाठी आशियातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर भगवा फडकवण्याची तयारी सुरू केली आहे.

आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेली ही मोठी सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी आता शिंदेंच्या शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदेंनी शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची राज्यातील यशस्वी गजचाल चर्चेत असून, मुंबई कषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत यशस्वी होईल का, याकडे लक्ष लागले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. राज्यातील 306 बाजार समितींची ही शिखर संस्था आहे. आता 24 फेब्रुवारीला सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक होत आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या संस्था ताब्यात घेण्यासाठी आता शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) फिल्डिंग लावली आहे.

DCM Eknath Shinde
Santosh Deshmukh Murder Case : धनंजय देशमुखांचा 'तो' खळबळजनक दावा; अंजली दमानिया म्हणाल्या, 'काय वाटेल ते आरोप करतील, पण...'

मुंबई (Mumbai) कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदासाठी रस्सीखेच आहे. साडेचार वर्षानंतर सभापती आणि उपसभापतिपदाची खांदेपालट होणार असून, 10 हजार कोटींची उलाढाल असलेल्या बाजार समितीच्या प्रमुखपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

DCM Eknath Shinde
Santosh Deshmukh Murder Case : ...तरच धनंजय मुंडेंचा अँगल बाहेर येईल; अंजली दमानियांच्या दाव्यानं खळबळ

फेब्रुवारी 2020 मध्ये निवडणुका झाल्यानंतर कोरोनामुळे सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक झालेली नाही. राष्ट्रवादीचे अशोक डक सभापती, तर काँग्रेसचे धनंजय वाडकर उपसभापती आहे. यानंतर विविध कारणांनी संचालक मंडळाचा कारभार गाजला आणि वादात देखील सापडला. अडीच वर्षांनंतर पदांची खांदेपालट होणे अपेक्षित होते. परंतु, राज्यातील अस्थिरतेमुळे ती झाली नाही. आता सभापती आणिउपसभापतिपदाची निवडणूक होणार असल्याने पुन्हा एकदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राजकारण तापू लागलं आहे.

बाजार समितीत बलाबल

बाजार समितीमधील 12 शेतकरी प्रतिनिधींपैकी दोघांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यांच्यापैकी एकाची सभापती व एकाची उपसभापतिपदावर वर्णी लागणार आहे. निवडणुकीत 10 शेतकरी प्रतिनिधी, पाच व्यापारी प्रतिनिधी, एक कामगार प्रतिनिधी आणि पाच सरकार नियुक्त प्रतिनिधी, असे 21 संचालक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सभापतिपद मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हे नाव आहे चर्चेत...

कोकण महसूल विभागातील शेतकरी प्रतिनिधी प्रभाकर पाटील ऊर्फ प्रभू यांच्या नावाची सभापतिपदासाठी चर्चा सुरू आहे. पाटील हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती समजले जातात. भाजप मंत्री गणेश नाईक यांच्याशीही त्यांची जवळीक आहे. त्यामुळे त्यांची वर्णी लागणार की आयत्या वेळी नवीन नाव समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com