शिंदेंनाही वाटलं नसेल की मुख्यमंत्री पद मिळेलं

M Eknath Shinde : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Sharad Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi News
Sharad Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama

Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळाली असून अनपेक्षितपणे शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाली आणि शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, ज्या काही घडामोडी मी बघतोय ह्या अनपेक्षित होत्या. मुख्यमंत्री म्हणून शिंदेनी शपथ घेतली मात्र त्यांनाही याबाबत वाटल नसेल की त्यांना मुख्यमंत्री पद मिळेलं. त्याची अपेक्षा ही उपमुख्यमंत्रीपदापर्यंत असावी, अस मत पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Sharad Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi News
तेव्हा तुम्हालाही मुख्यमंत्रिपद देणार होतो, असे तर फडणवीसांना सांगायचे नाही ना?

पवार म्हणाले की, शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर मी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. आता ते राज्याचे प्रमुख असून त्यांच्याकडून राज्याचा विकास व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने आदेश दिल्याने शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. मात्र याआधी त्यांनाही याबाबत खात्री नसावी. आदेश दिल्यानंतर तो कसा पाळावा लागतो. याच उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी आज घालून दिले आहे.

शिंदे मुख्यमंत्री झाल्याने सातारकरांना एकप्रकारे लॅाटरीच लागली आहे. माझेही मुळ गाव सातारा जिल्ह्यात असल्याने सातारा जिल्ह्याला पाचवा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. याचा आपल्याला आनंद झाला. शिंदे हे आमदारांना राज्यातून बाहेर घेऊन जाण्यात प्रभावी ठरले. 39 आमदार बाहेर घेऊन जाणं हे सोप काम नाही. मात्र ही कुवत त्यांनी दाखवली. ही गोष्ट अचानक घडली नसून त्यासाठी पुर्वतयारी करूनच बंडखोरी झाली असावी. उद्धव ठाकरे हे पूर्ण विश्वास टाकून काम करतात. त्यांनी पूर्ण विधिमंडळातील जबाबदारी ही एकनाथ शिंदेवर टाकल्याचा हा परिणाम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Sharad Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi News
सोलापुरात सावंतसेना होणार ‘पॉवरफुल्ल’!

फडणवीसांनी आनंदाने उपमुख्यमंत्रीपद स्विकारले असे मला वाटत नाही. त्यांचा चेहरा नाराज दिसत होता. पण ते राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे स्वयसेवक असल्याने त्यांनी हा आदेश पाळला आहे. मी पुन्हा य़ेईन असे म्हणणाऱ्या फडणवीसांनी करून दाखवल का? या माध्यम प्रतिनिधीच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, फडणवीसांनी काही करून दाखवले नाही. बहूमताने निवडून आले असते तर त्यांना शाब्बासकी दिली असती, असा टोमणा मारायला ते विसरले नाही.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. मात्र आता त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम बघावे लागणार आहे. हे काय नवीन नाही. आतापर्यंत शंकरराव चव्हाण, निलंगेकर, आशोकराव चव्हाण व अन्य माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे, असे उदाहरण त्यांनी दिले. दरम्यान इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडी व अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर विरोधकांविरोधात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com