Sharad Pawar Vs Ajit Pawar : थेट तटकरेंचाच 'तो' व्हिडिओ शेअर करत शरद पवार गटानं अजितदादांचा दावाच खोडून काढला

NCP Sharadchandra Pawar Paksha News : आता शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पुन्हा एकदा अजित पवारांची कोंडी केली आहे.
Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक वक्तव्य आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद ओढवून घेताना ते अडचणीत येतात. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. दिल्लीत मीडियाशी गप्पा मारताना अजितदादांनी मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. राष्ट्रवादीतील बंडाआधी आपण मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो असं विधान त्यांनी केलं होतं.

यावरुन राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना ठाकरे गटानेही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीकेची झोड उठवताना याची चौकशीची मागणी लावून धरली होती. यावर अजितदादांनी वेशांतर करुन दिल्लीवारी केल्याच्या चर्चांना धांदात खोटे ठरवत विरोधकांना खडसावलं होतं.

आता शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पुन्हा एकदा अजित पवारांची कोंडी केली आहे.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटातला वाद पेटण्याची शक्यता आहे.या व्हिडिओमध्ये सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये अजित पवार आले होते त्यांची आणि दिल्लीतल्या पत्रकारांची अनौपचारिक चर्चाही झाल्याचे सांगितले होते.

Sharad Pawar-Ajit Pawar
BJP Politics : काँग्रेस आमदाराच्या बालेकिल्ल्याला भाजपचा सुरुंग? देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनुकळे स्वतः येणार!

'हम तो डूबेंगे ही 'दादा' तुम्हें...'

शरद पवार गटाने सुनील तटकरेंच्या याच व्हिडिओचा संदर्भ देताना 'हम तो डूबेंगे ही 'दादा' तुम्हें भी ले डूबेंगे..!!' असं म्हणत अजित पवारांचा मी वेश बदलून गेलो त्याचे पुरावे दाखवा जर ते खरं असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेतो आणि पुरावे नसतील तर ज्यांनी आरोप केले त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं हा दावाच खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच शरद पवार यांच्या पक्षाने संबंधित व्हिडिओला बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा..!!" असं कॅप्शन देत अजित पवार गटाला खोचक सल्लाही दिला आहे.

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या होत्या.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीतसोबत जाण्यापूर्वी काय घडलं हे सांगतानाच काही धक्कादायक खुलासेही केले होते. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दहावेळा बैठका झाल्या होत्या.तसेच आपण मास्क आणि टोपी घालत वेश बदलून दिल्लीला जायचो, असा दावाही त्यांनी केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या वेशांतराचा मुद्दा संसदेत देखील आक्रमकपणे मांडला होता.तसेच या त्यावर विमानात वेश बदलून नाव बदलून जाण्याची परवानगी कशी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Sharad Pawar-Ajit Pawar
Fadnavis Vs Thackeray : ठाकरेंकडून ढेकणाची उपमा,शाहांवर कडवट टीका, फडणवीसांचा जशास तसा पलटवार; डोकं फिरल्यासारखा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com