Jitendra Awhad On Dilip Walse Patil : शरद पवारांचा अत्यंत विश्वासू माणूस कृतघ्न निघाला; वळसे पाटलांवर जितेंद्र आव्हाड कडाडले

NCP Agitation Against Dilip Walase : मुंबईत दिलीप वळसे पाटलांविरुद्ध जोडे मारो आंदोलन
Jitendra Awhad, Dilip Walse Patil
Jitendra Awhad, Dilip Walse PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटात सहभागी झालेले व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकदाही स्वबळावर सत्ता आली नाही, अशी टीका वळसे पाटलांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरातून वळसे पाटलांचा निषेध होऊ लागला आहे. त्यांचा राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. (Latest Political News)

मुंबईत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर दिलीप वळसे पाटलांविरुद्ध विभागीय राष्ट्रवादी युवकने जोडे मारो आंदोलन करणार आहे. तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वळसे पाटलांच्या विधानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. "हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला", अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी वळसे पाटलांवर केला आहे.

Jitendra Awhad, Dilip Walse Patil
Rohit Pawar On Talathi Exam : तलाठी परीक्षेवरून रोहित पवारांना संताप अनावर; म्हणाले "सरकारला अजिबात..."

दिलीप वळसे पाटलांनी थेट शरद पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सध्या वळसे पटालांचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. त्यांच्याविरोधातील रोष वाढून राज्यात सर्वत्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. यावर आव्हाड म्हणाले, "वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही. पण शरद पवारांसाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊनही साहेब मात्र कायमच रीते राहिले! बरे झाले पवारांविषयी त्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. हे महाराष्ट्र विसरणार नाही, त्यांना क्षमा करणार नाही. वळसे पाटलांना आंबेगाव धडा शिकवेल", असेही आव्हाडांनी इशाराल दिला आहे.

Jitendra Awhad, Dilip Walse Patil
Anil Deshmukh News: ‘समझोता करणार नाही’, असे म्हटल्यावर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली !

वळसे पाटलांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमधून टीका होत आहे. मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस निलेश भोसले यांनी ट्विट करून अनाजी पंताच्या मांडीवर बसले म्हणून छत्रपतींचा वारसा जपणाऱ्या शरद पवारांना बदनाम करु नका. आम्ही पातळी सोडली तर पुण्यात तोंड दाखवता येणार नाही, असे म्हटले आहे. पवारांबाबत आवमान कारक बोलणाऱ्या वळसे पाटलांविरुध्द मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जोडे मारो आंदोलन सोमवारी सकाळी करण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com