Mumbai News, 13 Nov : भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबाबत ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या समिकरणासाठी पाठिंबा होता. यासाठी त्यांनी पाच बैठका देखील घेतल्या होत्या. या बैठकीत अमित शाह, देवेंद्र फडणवीस, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल यांच्यासह आपण स्वत: उपस्थित होतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी केलेल्या दाव्या संदर्भात प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, "शरद पवारांचं नाव सोडून द्या, कारण देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक कधीच झाली नाही.
पण गौतम अदानी, अजित पवार, फडणवीस, अमित शाह, प्रफुल्ल पटेल यांच्या वारंवार बैठका झाल्या, असं म्हणत त्यांनी अजित पवारांचा (Ajit Pawar) दावा खोडून काढला आहे. तर गौतम अदानी यांना आमचं सरकार नको होतं. मुंबई महाराष्ट्र त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे ओरबाडायचा आहे, म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शिवसेना फोडली.
त्यासाठी अदानीचा वापर केला हे खुद्द त्यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार सांगत आहेत. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? असा सवाल राऊतांनी केला. तसंच "ही मुंबई उद्योजकांना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि खेळला. तो यशस्वी झाला.
त्यामुळे आमची या निवडणुकीतील लढाई ही गौतम अदानी आणि त्यांच्या व्यापारी वृत्ती विरोधात आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि गौतम अदानी हे एकच आहेत. या राज्यातील सूत्र अदानींना त्यांच्या हातात हवी आहेत. त्यामुळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडलं", असं राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.