Ajit Pawar : "शरद पवार आणि गौतम अदानी..."; पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar exposes truth behind 2019 early morning oath: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर राज्यात दीड दिवसाचे सरकार स्थापन झाले होते. या शपथविधीबाबत आता अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर राज्यात दीड दिवसाचे सरकार स्थापन झाले होते. या शपथविधीबाबत आता अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठा गौप्यस्फोट केला आहे.

तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या समीकरणासाठी पाठिंबा दिला होता. शिवाय यासाठी त्यांनी पाच बैठका देखील घेतल्या होत्या. या बैठकीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

एका मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, भाजपसोबत जाण्यासाठी जवळपास पाच बैठका झाल्या. या बैठकांना गृहमंत्री अमित शहा, उद्योगपती गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मी देखील हजर होतो.

या बैठकीत भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्वकाही ठरल्यानंतर नेतृत्वाने म्हणजेच शरद पवारांनी निर्णय बदलल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर आली, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे 2019 मधील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं सरकार राज्यामध्ये आणण्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा झाली होती. पहाटेच्या शपथविधीपूर्वी झालेल्या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानीसुद्धा हजर होते असं सांगतानाच ऐनवेळी शरद पवारांनी निर्णय बदलल्यामुळे सर्व दोष माझ्यावर आल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar
Sunil Kedar: केदारांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला; उद्धव सेनेचे सैनिक संतापले

शिवाय पहाटेच्या शपथविधीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आणि इतरांना वाचवलं असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अजितदादांच्या या गौप्यस्फोटामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवाय यावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com