Supriya Sule Tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत जात सत्तेत सामील झाले. या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावर दावा करत याबाबतचं पत्रही निवडणूक आयोगाकडे सादर केलं आहे. या घटनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत.
अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्या बंडखोरीवर सूचक भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची एक कविता शेअर केली आहे. ‘आलं तर आलं तुफान’ असं या कवितेंच शीर्षक आहे.या कवितेच्या माध्यमांतून सुप्रिया सुळेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीतीशी लढण्याचा निर्धारच केल्याचा संदेश दिला आहे.
सुप्रिया सुळेंनी शेअर केली यशवंतराव चव्हाणांची कविता
“आलं तर आलं तुफान”
तुफानाला घाबरुन काय करायचं
तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे
तुफानापासून पळून जाणाऱ्या
माणसाच्या हातून काही घडत नाही.
तुफानाला तोंड देण्याची
जी शक्ती आणि इच्छा आहे
त्यातनं तो काहीतरी करू शकतो
आणि घडवू शकतो
अशी माझी धारणा आहे– यशवंतराव चव्हाण (७ मे १९८४, अहमदनगर)
दरम्यान, ५ जुलै रोजी पार पडलेल्या शरद पवार गटाच्या मेळाव्यातही सुप्रिया सुळेंनी एक कविता सादर केली होती.त्यावेळी सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या होत्या, "१५ वर्षांपूर्वी दासू वैद्य यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिली होती. त्यावेळी मी स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते. त्यांनी माझ्यासाठी लिहिलं होतं की, ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’.
त्यानंतर आज दुपारी पुन्हा एकदा त्यांनी आपले वडील शरद पवार यांचा एक फोटो ट्विट करत कविता शेअर केली आहे. " भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं ना थका हूँ ना हारा हूँ , रण में अटल तक खडा हूँ मैं, या कवितेच्या ओळी त्यांनी शरद पवार यांच्या फोटोला कॅप्शन म्हणून दिल्या आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे ही राजकीय लढाई लढण्यासाठी आपणही तयार असल्याचे दाखवून दिले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.