Shtal Mhatre Viral Video: शीतल म्हात्रे 'व्हायरल व्हिडीओ'प्रकरणी 'एसआयटी' चौकशीचे आदेश

Maharashtra News : साईनाथ दुर्गेसह आतापर्यंत चार जणांना अटक
Sheetal Mhatre
Sheetal MhatreSarkarnama
Published on
Updated on

Shital Mhatre : शिवसेनेच्या प्रतक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाच्या तपासणीसाठी एसआयटी (SIT) पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) व्हिडीओप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT) तपास करणार करणार आहे. या प्रकरणी सहा टीम कार्यरत करण्यात आल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रॅलीत सामील झाले होते.

या रॅलीतील व्हिडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता.'मातोश्री'नावाच्या फेसबुक पेजवरुन (Matoshree Page) हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील साईनाथ दुर्गे हे अदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत.

Sheetal Mhatre
Farmers Long March : "फेकू बजेटमुळं शेतकऱ्यांचा उन्हात मोर्चा"

या व्हिडीओवरुन राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी साईनाथ दुर्गे (Sainath Durge), अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने अब्रुनुकसानीचा दावा करत दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप राज यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिकारांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com