शेलारांनी वरळीमधून निवडणूक लढवून दाखवावी; सचिन अहिरांचे खुले आव्हान

Sachin Ahir : मग शेलार कुणाच्या मतांवर निवडुन आले.
Ashish Shelar & Sachin Ahir Latest News
Ashish Shelar & Sachin Ahir Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानभवनाबाहेरून “आम्ही गड वगैरे काही मानत नाही”, म्हणत शिवसेनेला आणि अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंनाच (Aditya Thackeray)आव्हान दिले आहे. "वरळी हा आमचा गड आहे," असा दावा युवानेता आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

‘भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत… लवकरच.. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील” आमचं ठरलंय, असे टि्वट शेलार यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटवर शिवसेना आमदार सचिन अहिर प्रत्युत्तर दिले आहे. शेलार म्हणतात की, वरळीतील आमदार आमच्या मतावंर झाला. मग तुम्ही कुणाच्या मतांवर निवडुन आले? त्यांनी आपला मतदारसंघ बदली करावा आणि वरळीमधून निवडणुक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान अहिर (Sachin Ahir) यांनी शेलार यांना केलं आहे. त्यांना आज माध्यमांशी संवाद साधला. (Ashish Shelar, Sachin Ahir news update)

Ashish Shelar & Sachin Ahir Latest News
शिवसेनेतील गळती थांबेना : कोकणातील आणखी एक आमदार पुढील काही तासांत शिंदे गटात!

शेलारांनी केलेल्या ट्विटवर बोलतांना अहिर म्हणाले की, मी त्यांचं ट्विट वाचल आहे. खरतर काल ते असे म्हणत होते की वरळीतील आमदार आमच्या मतावंर झाले. मग ते कुणाच्या मतांवर निवडुन आले. लोकसभेचा खासदार कुणाच्या मतांनी निवडून आला? ज्या मतदारसंघात ते निवडुण येतात तो बालेकिल्ला कुणाचा होता. आमच्या जिवावर मांडीला माडी लावून ते निवडुण आले आहेत. आता वेळ बदलली म्हणून भाषा बदलण्याच काम काही लोक करत आहेत. शपथ पत्राबद्दल सुद्धा ते बोललेत. एव्हढेचं का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मात्र त्यांनी काळजी करायची गरज नाही. वरळीतील शिवसैनिक, मतदार हा शपथपत्रावर नाहीत तर निष्ठेवर आहे. शपथपत्र फक्त पदाधिकाऱ्यांची घेतली आहेत. त्यामध्ये साडेतीन हजार पदाधिकारी दिले आहेत. आतापर्यंत आम्ही मतदारांसमोर गेलो नाही आणि जाण्याची आवश्यकताही नाही, अशा शब्दात त्यांनी शेलारांना सुनावले.

Ashish Shelar & Sachin Ahir Latest News
एक मिनिट...शंभूराज, आपण एकत्र काम केलंय : अजित पवारांनी फटकारले

वरळीत भाजपला महापालिकेत खातेही खोलता आले नाही. वरळीतलीच दहीहंडी आम्ही फोडणार आहे, असे त्याचं म्हणने आहे. तर त्यांनी आपला मतदारसंघ बदली करावा. वरळीमधून लढा मग वरळीकर दाखवतील आपल्याला काय ते दाखवतील, असे आव्हान केले. दहीहंडी उत्सवाबद्दल बोलतांना पुढे अहिर म्हणाले की, श्री संकल्प प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आम्ही हा उत्सव करायचो. मात्र उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आम्ही हा उत्सव स्थगित केला आहे. मात्र उत्वव स्तगित केला म्हणजे बंद केला अस होत नाही. आजही आम्ही विविध मंडळांन मदत करत असतो. ज्या जांबोरी मैदानाचे कोट्यावधी रूपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले. त्याचे नुकसान होऊ नये यासाठी आणि येथील परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही तिथे सार्वजनिक आणि विशेष करून मोठे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Ashish Shelar & Sachin Ahir Latest News
राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांना 'ईडी' झटका देणार : खासदार निंबाळकरांचा गौप्यस्फोट

दरम्यान, जांबोरी मैदानावर उत्ववासाठी भाजच्या काही छोट्या कार्यकर्त्यांनी परवानगी घेतली आहे. मात्र माझं असे म्हणनं आहे की, भाजपच्या पारंपारिक दहीहंडी वरळी नाक्याला आमदार सुनिल राणे हे करत आहेत. मात्र त्यांचाच कार्यक्रम हायजाक करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? काहीजणांनी म्हटलं आहे की आम्ही दहीहंडी फोडायला येणार आहेत. त्यांचं वरळीकर स्वागतच करतील. मात्र, त्यांनी महापालिका निवडणुकीत आपलं खात उघडून दाखवावे, असे आव्हानही अहिर यांनी शेलार यांना केलं. आजही वरळीतील जनता ही शिवसेनेसोबत खंबीरपणे उभी असून आणि निवडणुकीत दाखवून देतील, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com