जुई जाधव-
Maharashtra Politics Latest News : राज्यात सध्या मतदानासाठी विकास कामांऐवजी इतर गोष्टींचा वापर केला जात असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारतर्फे आदिवासी महिलांना साडीवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून आता विजय वडेट्टीवारांनी ताशेरे ओढले आहेत.
विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या धर्मादाय आयुक्य कार्यालयामार्फत गोरगरीब लोकांना साड्या/ वस्त्र वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. यावरून आता विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या राज्यात मतदानासाठी विकासकमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. धर्माचा वापर केला जात आहे, विकासाला घेऊन नाही तर धर्मात राजकारण आणले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. दीड कोटी साड्यांचे वाटप केले जाणार आहे. साड्या देऊन नाकर्तेपणा लपवण्याचे काम सरकारतर्फे केले जात आहे. यांच्यावर साड्या नेसायची वेळ येऊ नये, यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
केंद्रात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावावर मते मागितली जात आहेत आणि राज्यात साडीवाटप करून मते मागितली जात आहेत, असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय आहे साडीवाटप कार्यक्रम?
साडीवाटपाचा कार्यक्रम हा प्रत्यक्ष पाड्यांमध्ये जाऊन घेतला गेला आहे. पाड्यांवर जाऊन तिथल्या महिलांना शिक्षणाचे, आरोग्याचे महत्त्व सांगितले गेले. त्यासोबत गरोदरपणात आरोग्याचे महत्त्व, बाळ सुदृढ जन्माला यावे यासाठी लागणारे आवश्यक आहार याचीदेखील माहिती दिली गेली आहे. आतापर्यंत 440 साड्यांचे वाटप झाले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. राज्यात धर्मा-धर्मावर राजकारण सुरू आहे आणि यामध्ये जनतेचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे. येत्या 22 तारखेला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे आणि त्याचा वापर भाजप मतदानसाठी करीत आहे. राम मंदिरचा वापर केला जात आहे आणि त्यासाठी केवळ निवडणुकाजवळ येत आहेत म्हणून केंद्र सरकारने राम मंदिरच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. निवडणुकीसाठी जनतेच्या भावनांशी खेळले जात आहे, असाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.