Old Pension Scheme : मोठी बातमी ; 'जुन्या पेन्शन'बाबत शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

Old Pension Scheme : जुन्या निवृती वेतन योजनेच्या निकषानुसार लाभ देण्याबाबतच्या पर्यायाचा विचार..
Shinde Fadnavis Pawar
Shinde Fadnavis PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, राज्य सरकारच्या यापूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर सेवेमध्ये रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या निवृती वेतन योजनेच्या निकषानुसार लाभ देण्याबाबतच्या पर्यायाचा विचार केला गेला आहे. यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

Shinde Fadnavis Pawar
NCP - Shivsena Vs Jitendra Awhad : प्रभू श्रीरामाविषयी वादग्रस्त विधान,आव्हाड ठाण्यात 'टार्गेट'..

राज्यमंत्रिमंडळात सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय -

वित्त विभाग -

*नोव्हें २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा

नगरविकास विभाग -

*अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये

दुग्धविभाग विकास -

*दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.

जलसंपदा विभाग -

* विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार

वित्त विभाग -

* मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.

वीज विभाग -

* पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान . 400 उद्योगांना फायदा

वस्त्रोद्योग -

*रेशीम उद्योगाच्या विकासासाठी " सिल्क समग्र 2" योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ

Shinde Fadnavis Pawar
Latur Loksabha Constituency : साडेचार वर्षे झाली, कुणाला लातूरचे भाजप खासदार आठवतात का?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्योग विभाग -

* द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार

परिवहन विभाग -

* नांदेड - बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता

सहकार विभाग -

* सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com