नारायण राणेंशी पंगा घेतल्याचा केसरकरांना फटका... शिंदेंनी घेतला कठोर निर्णय

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती
Eknath Shinde, Deepak Kesarkar
Eknath Shinde, Deepak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याने लवकरच किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्ते पदाची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दीपक केसरकर यांना भाजप (BJP) आणि शिंदे गटात दुरी निर्माण होईल, अशी विधाने करू नयेत अशी ताकिद देण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे गट गुवाहटीला गेल्यानंतर त्यांची भक्कम बाजू केसरकर यांनी मांडली होती. शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये केसरकर यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची बाजू घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता.

Eknath Shinde, Deepak Kesarkar
विश्रांतीनंतर मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा जाहीर : संतोष बांगरांसाठी करणार बॅटिंग

केसरकर म्हणाले, होते, नारायण राणे (Narayan Rane) यांनी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता, असा दावा त्यांनी केला. भाजपचे व्यासपीठ वापरून त्यांनी आदित्य यांची बदनामी केली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नारायणे राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आदित्य यांच्यावर टीका केली होती, असेही केसरकर यांनी सांगितले होते.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसोबत संपर्क केला. मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम, आदर असल्याचे दिसून आले. हे प्रकरण नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात संवाद सुरु झाला. यानंतर पंतप्रधान मोदी आणि ठाकरेंची भेट झाल्याचेही केसरकर यांनी सांगितले होते.

Eknath Shinde, Deepak Kesarkar
दोन मंत्र्याचं सरकार, एकही निर्णय नाही; कुठे आहे राज्य कारभार? : अरविंद सावंतांचा सवाल

तीन दिवसापूर्वी सासवडला झालेल्या मेळाव्यात 'आम्हाला केसरकर यांच्यासारखे संत भेटले' असे शिंदे यांनी सांगितले होते. केसरकर यांनी आमची बाजू व्यवस्थीत मांडली आणि नंतर मला इतर गोष्टी मांडण्यासाठी वेळ मिळाला. शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची बाजू माध्यमांमध्ये आणि जनतेसमोर अधिक जोमाने केसरकर यांनी मांडली होती. मात्र, शुक्रवारी केसरकर यांनी राणे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे थेट त्यांना बदलण्यापर्यंत गोष्टी गेल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com