शिवसेनेचा हल्ला पूर्वनियोजित ; सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेवरुन हा हल्ला करण्यात आला. शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,'' असा आरोप सोमय्यांनी आज केला आहे.
Kirit Somaiya
Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शनिवारी पुणे महापालिकेत हल्ला झाला होता. सोमय्या हे शनिवारी पुणे महापालिकेत जम्बो कोरोना रुग्णालयाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले असता तेव्हा शिवसेना आणि त्यांच्यात शाब्दीक वाद झाला.

या गोंधळात सोमय्यांना धक्काबुक्की झाली. शिवसैनिकांनी त्यांच्या रस्ता अडविल्यामुळे ते महापालिकेच्या पायऱ्यावर पडले. या हल्ल्याबाबतचा व्हिडिओ सोमय्यांनी आज समाज माध्यमांवर शेअर केला आहे.

''पुण्यात शिवसैनिकांनी (shivsena) माझ्यावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेवरुन हा हल्ला करण्यात आला. शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,'' असा आरोप सोमय्यांनी आज केला आहे.

या हल्ल्याची चैाकशी व्हावी, यासाठी उद्या (मंगळवारी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार असल्याचे सोमय्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा भष्ट्राचार उघड केल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. ठाकरे हे चैाकशीला का घाबरतात,'' असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

शनिवारी पुण्यात शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले होते. त्यांना दुखापत झाल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शनिवारी संचेती रुग्णालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे यांनी किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Kirit Somaiya
आम आदमी पार्टीचे चारही उमेदवार ठरले ''रणछोड दास''

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधीर शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. ''किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की गुंडाराज," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

''लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट देण्यात आलं होतं. कोरोना काळात कोविड सेंटर सुरू असताना अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांच्या मृत्यूला हॉस्पिटलचे व्यवस्थापन कारणीभूत आहे. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीला कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले. सुजित पाटकर यांची ही कंपनी आहे. याप्रकरणी सरकार तसेच संबंधित यंत्रणांकडून कामात कसूर झाल्याचे दिसत आहे,'' असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com