Uddhav Thackeray on Eknath Shinde: 'बाळासाहेबांचा फोटो असतानाही शिवसेनेच्या शाखेवर हातोडा मारला'

Maharashtra Politics: "भाजपनेच ढीगभर घोटाळे करुन ठेवले आहेत. स्वत:नेच चोरी करायची आणि चोर चोर म्हणून ओरडायचं
Uddhav Thackeray Vs  Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Criticized Eknath Shinde: मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असणारी शाखा त्यांनी तोडली. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतानाही वरून हातोडा मारला. असा एक तरी हातोडा भाजपच्या नेत्यांच्या भिंत्यांवर मारण्याची हिंमत दाखवा. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.

मुंबईत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. ''बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर हातोडा चालवताय आणि बाळासाहेब आमचं दैवत आहे, असंही म्हणताय.. तुम्ही आमच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचललात. पण आता यापुढे जो हात उचलेल तो हात जागेवर ठेवायचा नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिला आहे. कोरोना काळातही आपण एकाही पैशाची अफरातफर न करता आपण लोकांचे प्राण वाचवले, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Uddhav Thackeray Vs  Eknath Shinde
Udhhav Thackerya On Fadnavis : परिवाराबद्दल बोलू नका, तुमचेही व्हॉट्स अॅप बाहेर, बोललो तर शवासन करावं लागेल; ठाकरेंचा फडणवीसांना इशारा...

'' पण कोरोना महामारीच्या संकटातही तुमचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मला मंदिरं उघडण्यासाठी दबाव टाकला जात होता. पण मी मंदीरे उघडली नाहीत आणि मला अभिमान वाटतो, मी जे जे सांगत गेलो. ते ते सर्व माझ्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं. कोरोना काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या जवळपास सात लाख मजूरांची आपण सोयही केल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. (Maharashtra Politics)

उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपनेच (BJP) ढीगभर घोटाळे करुन ठेवले आहेत. स्वत:नेच चोरी करायची आणि चोर चोर म्हणून ओरडायचं, याचे त्याचे घोटाळे काढायचे, सगळ्यांच्या चौकशा करा, संजय राऊतांनीही ईडी कडे तक्रारी केल्याच आहेत. त्या तक्रारींवर काही होणार तर नाही, पण काही झालचं तरी क्लीनचिट मिळून जाईल."

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com