Udhhav Thackerya On Fadnavis : परिवाराबद्दल बोलू नका, तुमचेही व्हॉट्स अॅप बाहेर, बोललो तर शवासन करावं लागेल; ठाकरेंचा फडणवीसांना इशारा...

Udhhav Thackerya On Fadnavis : माझ्या परिवाराबद्दल बोलू नका. कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहे
Udhhav Thackerya On Devendra Fadnavis
Udhhav Thackerya On Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई येथे पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मेळावा पार पडला. १ जुलै रोजी ठाकरे गट मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. त्या अनुषंगाने तयारी आणि मार्गदर्शनासाठी आजच्या मेळाव्याचे नियोजन होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सडकून टीका केली. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले, "एक तारखेला आपण महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत. आजचं जे वातावरण आहे, त्यापेक्षा आपला मोर्चा वेगळा आहे. हे भाजपवाले कोविड काळातला घोटाळा काढणार म्हणे,जरूर काढा. कारण त्यांची ही यांची पोटदुखी आहे. कोविड काळात भाजपचा एकही मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये नव्हता, ही यांची पोटदुखी. या पोटदुखीवर त्यांना आता चांगला जमालगोटा द्यायचा आहे. "

Udhhav Thackerya On Devendra Fadnavis
Satara News : प्लॉटिंग करून पैसा कमवायचा ‘त्यांचा’ प्रयत्न : शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

"जो काही बोभाटा सुरू केला आहे. सूरज चव्हाणवर धाडी टाकल्या, तो सामान्य शिवसैनिक आहे. पण नुसतं राजकारण करायचं. मी काल विरोधकांच्या बैठकीसाठी बिहार गेलो होतो. यावर लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. फडणवीस एवढ्या खालच्या पातळीला येऊ नका, परिवार तुम्हाला देखील आहे. तुमचे व्हॉट्स अॅप देखील बाहेर आलेले आहेत. आम्ही त्याच्यावर अजून बोललेलो नाही. जर मला बोलावं लागलं तर तुम्हाला शवासन करावं लागेल. शवासन करून नुसताच योगा डे साजरा करावं लागेल. माझ्या परिवाराबद्दल बोलू नका. कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहे," असा इशाराही त्यांनी फडणवीसांना दिला.

Udhhav Thackerya On Devendra Fadnavis
Satara News : उदयनराजे, शिवेंद्रराजे वादावर बावनकुळे म्हणाले, ही भाजपची संस्कृती नाही...

"आपला संपूर्ण देश संस्कारामुळे, लोकांच्या संयमामुळे सुरू आहे. भाजपच्या हातातून देश केव्हाच सुटलाय. मी नायक की खलनायक हे लोक ठरवतील, पण तुम्ही नालायक ठरला आहात. कोविड काळात जे काही सरकारने काम केलं, त्यामुळे माझ्या मागे लोक उभे आहेत, घोटाळ्यांची जरूर चौकशी करा. पण पंतप्रधांन नरेंद्र मोदींनी आपतकालीन कायदा आणला होता. त्यानुसारच त्यावेळी कामकाज केलं गेलं. पण केंद्राकडून पीएम केअर फंड जमा केला होता. त्या फंडचा हिशोब अजूनही का नाही दिला? त्यांचीही चौकशी करा, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळीच चौकशी करा, पण ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झालाय ते आमची काय चौकशी करणार?" असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com