
EVM hack controversy India : ईव्हीएम मशीन हॅकचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता तर राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा सहप्रमाण मांडून देशात खळबळ उडवून दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मत चोरीवर दिल्लीत इंडिया आघाडीनं काढलेल्या मोर्चावर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत असताना, ईव्हीएम मशीकच्या हॅक होते, यावर बोलून गेले. ही मशीन हॅक कशी होते, याचे प्रात्यक्षिक भाजप नेत्यांनी दाखवल्याचा दावा, करत उद्धव ठाकरेंनी खळबळ उडवून दिली. ठाकरेंच्या या दाव्यामुळे आणखी एका वादाला तोंड फुटलं आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीत दोघं भेटून 160 पेक्षा जास्त जागा निवडून येत असल्याचा दावा केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. 'निवडणुकीच्या काळात अशी लोकं भेट असतात. पण आता मत चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर या लोकांना भेटण्याचा रस निर्माण झाला आहे. त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकायला आवडेल', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "निवडणुका आल्यानंतर अशी लोकं भेटत असतात. आम्ही गांभीर्यानं घेत नाही. आम्हाला आमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. आम्ही काही त्यांच्या नादी लागलो नाही. आता जे कुणी भेटून गेले, ते कुठे सापडताय, सापडल्यानंतर अशा काही गोष्टी ऐकूण घेण्यात रस आहे."
'मला याच निवडणुकीत नाही, तर भाजपबरोबर युती तेव्हा भाजपच्या एका नेत्यानं 'EVM' कसं हॅक केलं जात, याचं प्रात्यक्षित दिलं होतं', असा दावा करून खळबळ उडवून दिली. हा भाजप नेता कोण? त्याचं नाव सांगा, असा माध्यमांच्या प्रतिनिधींनी केल्यावर उद्धव ठाकरेंनी नकार दिला. 'आता ते नेते नाहीत, नुसतेच आहे', असे ठाकरेंनी म्हणताच एक हशा पिकला.
'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील व्हीव्हीपॅट देखील काढलं. आमची मागणी होती, बॅलेट पेपरवर निवडणुक घ्या. व्हीव्हीपॅटवरील मतमोजणी घ्या. ती मोजणी देखील कधीच झाली नाही. झाल्यास, तर ती तुरळक, अशी झाली. आता तर व्हीव्हीपॅट काढून टाकली जात आहे', असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
'आम्हाला, तर व्हीव्हीपॅटवर देखील संशय होता. रिसिट जशीच्या तशी पडते की नाही. पण निवडणुक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार एक-एक निर्णय घेत चाललं आहे. म्हणून निवडणूक आयोग किंवा आयुक्त, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं झालं आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.