
Nashik Shiv sena: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं नाशिकच्या हॉटेल एक्स्प्रेस इन इथं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. या नेत्यांची उपस्थिती असतानाच पक्षाच्या दोन गटामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी थेट एकमेकांची कॉलर पकडली. पण या संपूर्ण राजकीय ड्राम्याला राष्ट्रवादीचा पदाधिकारी कारणीभूत ठरला असल्याची माहिती मिळते आहे.
बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर दोन गट आपापसात भिडले. दोन गट आपापसात भिडल्यानं एकच गोंधळ उडाला. पोलिसांसह उपस्थित सुरक्षा रक्षकांनी यावेळी हे भांडण सोडवलं. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप यावेळी काही जणांनी केला.
दरम्यान, उदय सामंत यांनी या राड्यावर भाष्य करताना म्हटलं की, ज्या व्यक्तीच्या समर्थकांनी हे केलं त्याची दखल घेण्यात आली आहे. पक्षाकडून त्यांची गय केली जाणार नाही. या हाणामारीच्या घटनेचा अहवाल एकनाथ शिंदे यांच्याकडं सुपूर्द करण्यात येणार आहे. हा किरकोळ वाद आहे, गैरसमजामधून हे झालं आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बैठकीत घडलेल्या गोष्टी बाहेर सांगणं उचित नाही. आम्ही त्यांना समज दिली आहे. ही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेली असताना त्यात कार्यकर्त्यांनी वाद घातला.
यावेळी शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, "कर्जत तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता या ठिकाणी आतमध्ये आम्हाला दिसला. त्यामुळं आम्ही त्याला सांगितलं की, ही आमच्या पक्षाची बैठक आहे, तू काही याठिकाणी थांबू नकोस, त्याला त्वरीत बाहेर काढा. त्यामुळं इथं गोंधळ झाला"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.