शिवसेनेकडून काँग्रेसला सुधारणांचे डोस ; बेगडी निधर्मीवादाचा 'हिजाब' दूर करा

हे सर्व नेते बाहेर राहुन गांधी परिवाराची तारांबळ ‘एन्जॉय’ करीत होते व मनोमन काँग्रेसच्या अपयशाची मनोकामना करीत होते
sanjay raut
sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत कॉग्रेसने सपाटून मार खाल्ला आहे. या पराभवाचे आत्मचिंतन सध्या कॉग्रेसचे नेते करीत आहेत. देशभरात कॉग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं (shiv sena)जी २३ नेत्यांवर टीका करीत कॉग्रेसच्या नेत्यांना सल्ला दिला आहे.

कॉग्रेसच्या (congress)कार्यकारिणीची बैठक रविवारी झाली. या बैठकीत पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यात आले. पाच राज्यात पराभव झाल्यामुळे गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याची चर्चा दोन दिवसापासून सोशल मीडियावर सुरु आहे. ''पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत,'' असे सोनिया गांधी म्हणाल्या. मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यास नकार दिला आहे.

"गांधींनी नेतृत्व सोडावे हे ठीक, पण काँग्रेसला पुढे घेऊन जाणारा, जिंकून देणारा नेता त्यांच्या ‘जी २३’ गटात आहे काय? काँग्रेसच्या ताटातले आणि वाटीतले खाऊन-पिऊन अनेकदा ढेकर देऊन स्वस्थ झालेले नेते ‘जी २३’मध्ये आहेत व काँग्रेस पराभवाचा ते विलाप करीत आहेत. यापैकी किती नेते पाच राज्यांतील निवडणुकांत जमिनीवर उतरले होते? किती जणांनी प्रत्यक्ष प्रचारात झोकून दिले होते? पी. चिदंबरम, केसी वेणुगोपाल, सचिन पायलट, भूपेश बघेल असे काही मोजके नेते दिसत होते," असे आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

sanjay raut
सोनिया गांधी अँक्शन मोडमध्ये ; पराभवानंतर पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना डच्चू

"प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशात होत्या. राहुल गांधी गोवा, उत्तराखंड, पंजाबात होते, पण गुलाम नबी, कपिल सिब्बल व २३ कॅरेटचे नेते या रणधुमाळीत कधी दिसले नाहीत. हे सर्व नेते बाहेर राहुन गांधी परिवाराची तारांबळ ‘एन्जॉय’ करीत होते व मनोमन काँग्रेसच्या अपयशाची मनोकामना करीत होते असेच वाटते. हे खरे की, आता काँग्रेस पक्षाला नवी उभारी देणारे आणि नवा विचार रुजवून तरुणांना आकर्षित करणारे नेतृत्व हवे आहे." असा सल्ला अग्रलेखात दिला आहे.

'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे की..

  • काँग्रेसचा बुंधा सुकला आहे व वृक्ष निष्पर्ण झाला आहे. पालवी फुटावी, बहर यावा, वातावरण ताजेतवाने व्हावे असे कोणाला मनापासून वाटत असेल तर झाडाची पूर्ण छाटणी करून नव्याने बगिचा फुलवावा लागेल.

  • भाजपच्या यशाचा डोलारा कृत्रिम आहे. कृत्रिम झाडे, कृत्रिम पाऊस, कृत्रिम गवत असा सर्व आधार आहे. ‘हिजाब’सारखी प्रकरणे उकरून काढणे, ‘कश्मीर फाईल्स’चा चित्रपटातून ‘प्रपोगंडा’करणे असे प्रकार काँग्रेस किंवा अन्य पक्षांना आता जमायला हवेत"

  • कश्मिरी पंडितांच्या पलायनामागचे सत्य वेगळेच आहे. केंद्रात भाजप पाठिंब्याचे व्ही. पी. सिंग सरकार होते व कश्मीरात भाजपचे प्रिय जगमोहन हे राज्यपाल असताना पंडितांना पलायन करावे लागले, हे सत्य समोर आणण्यात भाजपविरोधक तोकडे पडत आहेत.

  • काँग्रेससारखे पक्ष आजही परंपरांच्या शृंखलांत व जळमटात अडकून पडले आहेत. ‘जी २३’ गटात असा कोणी लढवय्या असेल तर त्यांनी दंड थोपटून पुढे यायला हरकत नाही, पण ते शक्य आहे असे वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com