शिंदेंची शिवसेनेने हकालपट्टी केली.. पण बंडखोरांनीही अशी तयारी केलीय...

शिवसेनेचे आमदार व शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या विधानभवनात समोरासमोर येणार आहेत.
Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई - राज्यात शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट व भाजपने केलेल्या सत्तांतरामुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या सत्तांतर नाट्याचा क्लायमॅक्स उद्या ( रविवारी ) होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे आमदार व शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या विधानभवनात समोरासमोर येणार आहेत. Shivsena Vs Shivsena News Update

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली. या हकालपट्टीच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे.

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधीमंडळाच्या कामकाजापासून रोखा!

पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा दणका दिला आहे. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भरकटत चालली असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार नको, अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांनी 20 जूनला बंडाचा झेंडा फडकविला होता. बंड यशस्वी झाल्याने शिंदे गटाने शिवसेना पक्षावरच दावा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात हकालपट्टीची कारवाई केली आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या या निर्णयालाच न्यायालयात आव्हान देण्याचे शिंदे यांच्या गटाने जाहीर केले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे स्पष्ट करीत लवकरच या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का..? एकनाथ शिंदेंनी दिले हे उत्तर...

अंतिम अधिकार पक्ष प्रमुखाचा

शिवसेना नेत्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेना प्रमुख’ हे पद सर्वोच्च आहे. तसेच पक्षाला राष्ट्रीय कार्यकारिणी असून या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानेच पक्षाच्या धोरणे तसेच पक्षातील नियुक्त्या ठरविल्या जातात. मात्र त्यात अंतिम अधिकार पक्ष प्रमुखाचा असतो. त्याचप्रमाणे कोणाला पक्षातून काढायचे याचाही अंतिम अधिकार हा पक्षप्रमुखकडेच असतो. त्यामुळे शिंदे गटाचा दावा न्यायालयात टिकणार नसल्याचा विश्वास या नेत्याने व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com