"एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे.."

Sushma Andhare : 'वरचा मजला रिकामा' असा मराठीत एक वाक्प्रचार आहे..
Sushma Andahare
Sushma AndahareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dombivali News : मुलुंड येथे झालेल्या महाप्रबोधन यात्रेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 'उठ दुपारी अन् घे सुपारी' असा त्यांचा कार्यक्रम असतो, अशा शब्दांत टिका केली होती. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अंधारे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. "आमच्याकडे एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे." असे खडे बोल आमदार पाटील यांनी अंधारे यांना लगावले आहेत.

Sushma Andahare
Sushma Andhare : सुषमा ताईंनी ओवाळावे; आम्हीही साडी, चोळी देऊन सन्मान करू...

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ठाकरे गटाची तोफ असे वर्णन अंधारे यांचे केले जात असून, आपल्या भाषणातून त्या भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना राज यांच्यावर त्यांनी सडकून टिका केली होती.

अंधारे यांनी राज यांना उद्देशून म्हटले की, "आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी, असा त्यांचा कार्यक्रम असतो. याला थोडं बोलेन, त्याला थोडं बोलेन, काही वेळासाठी विचारवंत होईल, मध्येच मिमिक्री कलाकार होईल, असा त्यांचा कार्यक्रम असतो." अंधारे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे आमदार यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी अंधारे यांना खडे बोल सुनावले आहेत.

Sushma Andahare
साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई; तर शिवसेनेच्या दोन्ही गटात सामना रंगणार

राजू पाटील ट्विट करत म्हणाले की, 'वरचा मजला रिकामा' असा मराठीत वाक्प्रचार आहे, परंतु आमच्याकडे एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे. आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.