मित्रासोबतचे फोटो बॅनरवर लावून बदनामी करण्याची शिवसेना नेत्याची महिलेला धमकी

शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांनी महिलेचे व तिच्या मित्राचे फोटो व्हायरल केले होते.
shivsena
shivsenasarkarnama

नवी मुंबई : रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे (Shivsena) सल्लागार बबन पाटील आणि खारघरचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्या विरोधात विनयभंंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. करंजाडे-वडघर येथील एका महिलेने याबाबतची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार खारघर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे महिलाच्या सन्मानाकरिता कायदे करत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांचा अपमान करून विनयभंग करत असल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. (Shiv Sena leader Baban Patil, Shankar Thakur charged with molestation)

shivsena
लतादीदींच्या स्वरमयी प्रवासाचे सोलापूर कनेक्शन...

संबंधित तक्रारदार महिला ही आपल्या पतीपासून विभक्त राहत असून घरकाम करते. या महिलेचे आणि तिच्या एका मित्राचे फोटो माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर व शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या फोटोंसोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांचे शहर प्रमुख यांचा प्रताप असा मेसेज टाकला. हा मेसेज आणि फोटो व्हॉट्स ॲप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे पीडित महिलेला समजल्यानंतर त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी संबंधित महिला शंकर ठाकूर यांच्या घरी गेली होती. त्यावेळी माजी शहरप्रमुख ठाकूर यांनी अर्वाच्य आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करून घरात धक्काबुक्की केली, असे तक्रारीत पीडित महिलेने म्हटले आहे.

shivsena
सोमय्यांवरील हल्ल्याबाबत उदयनराजे म्हणाले, ही तर झुंडशाहीची नांदी...

दरम्यान, शिवसेनेचे रायगडचे सल्लागार बबन पाटील यांनी त्या महिला तिच्या मित्रासोबतचे फोटो बॅनरवर लावून बदनाम करण्याची धमकी दिली होती. त्याबाबतची तक्रार संबंधित महिलेने खारघर पोलिस ठाण्यात दिली होती, त्यानसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे खारघर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून पोलिस शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

shivsena
जयंत पाटलांचा अलिबागच्या विकासात खोडा : शिवसेना आमदार दळवींचा हल्लाबोल

यासंदर्भात शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, याबाबतची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या बाबतची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आली आहे. या पुढचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com