मुंबई : शिवसेनेची पंरपंरा असलेल्या दसरा मेळाव्यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यंदा शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेचा दसरा होणार की नाही आणि होणार तर कुणाचा होणार याबाबात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. यानंतर शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावाही केला जात आहे.
दरम्यान, दसऱ्याला होणाऱ्या शिवाजी पार्कवरील शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असून, भाजपवाले पडद्यामागून मदत करत असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता मनसेनेही यामध्ये उडी घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. (Sushma Andhare & Raj Thackeray Latest News)
हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्हीच पुढे घेऊ जाऊ असा दावा मनसे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंकडून केला जात असतांना आता शिवसेनेचा परंपरागत असलेला दसरा मेळावा कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात आता मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंनी दसऱ्याच्या दिवशी जनतेला संबोधित करावे,अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. नेमकी यावरच सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत हल्लाबोल केला.
अंधारे म्हणाल्या की, कोणत्याही कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबाबत अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. तसेच आपल्या नेत्यामध्ये चांगले गुण आहे, ते नेतृत्व करण्यास सक्षम आहे, असे वाटणं सुद्धा सहज स्वाभाविक आहे. या न्यायाने मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याबाबत काही वाटत असेल. तर त्याबद्दल आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. मात्र, त्यांनी काही प्रश्न हे स्वत:ला विचारली पाहिजे की खरच आपण बाळासाहेबांचा वारसा चालवत आहे का? राज ठाकरे बाळासाहेबांनी निर्माण केलेली प्रादेशिक अस्मिता आणि पक्ष संपवण्याच कंत्राटी पद्धतीने काम तर आपण करत नाही ना? याबाबत त्यांनी विचार करावा,असा टोला देखील अंधारे यांनी राज यांना लगावला.
दरम्यान, मनसे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले यांनी दसरा मेळाव्याला देशातील तमाम हिंदुला, महाराष्ट्रातील मराठी माणसांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सोने लुटले जायचे. २०१२ नंतर ही परंपरा कुठेतरी खंडीत झाल्यासारखी वाटते. दसरा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांचे विचार आणि मराठी माणसांचे विचार ही जनतेला सवय झाली होती. आज जो वाद सुरू आहे तो स्थळावरून आहे असा टोला मनसेने लगावला होता.
तसेच, ५६ वर्षांत शिवसेनेने असे ५६ लोक पाहिले. शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथे ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सुनावले. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून संभ्रम-बिंभ्रम अजिबात नाही. दसरा मेळावा आमचाच, म्हणजे शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच होणार. तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक भाग आहे. मात्र, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा निर्धार उद्धव ठाकरेंनी यांनी काल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.