
Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. विधान भवनात दुपारी १ वाजता सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीत नव्याने पुरावे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. दोन्ही गटांना १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. उद्या दोन्ही गटांकडून नव्याने सादर केल्या जाणाऱ्या पुराव्यांची पडताळणी होणार आहे आणि उद्या सुनावणी होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय येत्या ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे एक मोठे विधान पुढे आले होते. जनता आणि कायद्याला अपेक्षित असणारा निर्णय आपण देऊ, असे सूचक वक्तव्य नार्वेकर यांनी केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या १५ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रेतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने सरन्यायाधीशांनी कडक शब्दांत विधानसभा अध्यक्षांची कानउघाडणी केली होती. तसेच, नार्वेकरांचे वकील देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करून वेळापत्रक ठरविण्याची सूचना केली होती.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कानपिचक्यानंतर ॲड. नार्वेकर यांनी २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांची विनंती धुडकावून लावत शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेण्यात यावा, असा आदेश दिला होता. त्यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला वेग आला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.