Shiv Sena MLA Disqualification Result : शिंदे गटाच्या आमदारांना बाळासाहेब भवनात जमण्याचे आदेश!

MLA Disqualification Result : आमदार अपात्रता प्रकरणावर पुढील काही वेळात निकाल येणार...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thackeray Group Vs Shinde Group

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर पुढील काही वेळात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल देणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची धाकधूकही वाढली आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमदारांना कशासाठी बोलावण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण निकालानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी शिंदे गटातील आमदारांना बाळासाहेब भवनात येण्यास सांगण्यात आले आहे. विधान भवन परिसरात आमदारांनी गर्दी करू नये, अशी सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Eknath Shinde
MLA Disqualification Result : निकालानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर काय देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ही उत्सुकता आता वाढली आहे. यामुळे विधान भवन परिसरात कुठल्याही गटाचा एकही आमदार नाही. परिसरात शांतता आहे. पण निकालानंतर मुंबईतले वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकाल आमच्या बाजूने लागणार, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे, तर ठाकरे गटाने ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला आहे. मात्र निकाल आता काही वेळातच लागणार असल्याने सर्वांची धाकधूक वाढली आहे.

R...

Eknath Shinde
Shivsena MLA Disqualification Result : अपात्रतेच्या निकालावर राष्ट्रवादीच्या आमदाराची नार्वेकरांकडे वेगळीच अपेक्षा, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com