जुई जाधव
Mumbai : शिवसेना आमदार अपात्र निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट निकाला आधीच एकमेंकावर टीका करत आहेत.राजकीय तज्ज्ञ या निकालावर अंदाज व्यक्त करत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने यावर भाष्य केले आहे. त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडून वेगळीच अपेक्षा व्यक्ती केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात 'आमदार अपात्रतेच प्रकरण' हा गेल्या सहा दशकांत कधीही निर्माण न झालेला घटनात्मक पेच आहे. हा प्रश्न संवैधानिक तरतुदींशी निगडीत आहे.विधानसभा अध्यक्षांनी त्याकडे त्याच नजरेतून पाहिलं असेल ही आशा. असे आव्हाड आपल्या ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या ट्विटद्वारे विधानसभा अध्यक्षांकडून आपल्या न्यायाच्या बाजुने उभे राहण्याची अपेक्षा असल्याचे सूचित केले आहे.
आजचा निर्णय केवळ दोन गटांचा नसून कोणते विषय पक्षांतर्गत आहेत? कोणते सभागृहाच्या,कायद्याच्या,तर कोणते निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेत येतात..? या बाबी स्पष्ट करणारा देखील असणार आहे. ज्याचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील भविष्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अग्रणी ठरलेल्या महाराष्ट्राला मिळालेली ही आणखीन एक ऐतिहासिक संधी आहे., याची आठवण आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून करून दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सध्याच्या एकाधिकरशाही होऊ घातलेल्या व्यवस्थेत विधानसभा अध्यक्षांना संवैधानिक मार्गाचा अवलंब करून निकाल देण्याची ही वेळ आहे. बहुमत हेच योग्य मत असतं हा गैरसमज खोडून काढण्याची आणि कुणाच्याही दबावाला बळी न पडता न्यायाच्या बाजूने उभं राहण्याची ही वेळ आहे...! सत्यमेव जयते!, असं आपल्या ट्विटमध्ये दबाला बळी न पडण्याचे अध्यक्षांना आवाहन करत सरकारवर निशाण साधाला आहे.
धाकधूक वाढली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याने ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. हा सामान फिक्स असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. आदित्य ठाकरे यांनी देखील या भेटीवरून विधानसभाअध्यक्षांना सुनावले. तर, शिंदे गटाकडून मात्र ही भेट विधानसभा अध्यक्षांच्या मतदार संघातील कामकाजाबाबत होती, असे म्हणत ठाकरे गटाला लक्ष्य केले. मात्र, या भेटीने दोन्ही गटांची धाकधुक वाढवली आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.