अरविंद सावंतांचे अमित शहांना प्रत्युत्तर; बंगाल, पंजाब अन् दिल्लीसारखी परिस्थिती होईल

Arvind Sawant : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत.
Arvind Sawant, Amit Shah
Arvind Sawant, Amit Shahsarkarnama

मुंबई : मुंबई महापालिका म्हणजेच शिवसेनेचा भगवा झेंडा कुणीही हलवू शकत नाही. भाजपचे (BJP) तसेच असते, त्यांचे फक्त मिशन असते, आज काय लोटस मिशन, परवा काय दुसरे मिशन. या मिशनमुळे मूळ प्रश्न मिसींग असतात. अनेक गोष्टींपासून भाजप दूर आहे. जनतेच्या प्रश्नांपासून दूर आहे, मराठी माणसांच्या अस्मितेपासून दूर आहेत, असा टोला शिवसेनेचे (Shivsena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना लगावला.

अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीका केली होती. त्या टिकेला सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सावंत म्हणाले, मुंबईत विविध जाती, धर्म, पंथाची माणसे शांततेने राहत आहेत. दुष्काळ असला तरी मुंबईला पाणी मिळते याचा कुणी विचार केला का? अप्पर वैतरणा, लोअर वैतरणा आणि मिडल वैतरणा धरण बांधून पूर्ण झाले आहेत. मिडल वैतरणा धरणाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले. ते धरण मुंबई महापालिकेच्या पैशातून बांधण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. त्यावेळी राज्य सरकार वेगळे होते. केंद्र सरकार वेगळे होते, त्यांनी निधी दिला नाही. मात्र, मुंबई महापालिकेने पैसे खर्च करुन धरण बांधले. दुष्काळी परिस्थिती असली तरी मुंबईकरांना पाणी मिळते त्याला कारण शिवसेनाच आहे. ज्याने आपल्याला पाणी दिले त्याला मुंबईकर कसा विसरेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

खासदार संजय राऊत यांच्या प्रकरणात नवी तारीख मिळाली. ती कायदेशीर बाब आहे. सगळीकडे तारीख पे तारीख सुरु, असल्याचेही सावंत यावेळी म्हणाले. शिवसेनेचे आणि मुंबई महानगरपालिकेचे नाते दृढ आहे. कुणी कितीही वल्गना केल्या तरी, बंगाल, पंजाब व दिल्लीत भूईसपाट झाले तेच मुंबईत होणार, मुंबईकर सूज्ञ आहे, असा इशारा सावंत यांनी दिला. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिका चालवते ते उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळे सुरु झाले आहे.

पोटात एक अन् ओठात एक ही पद्धत कुणाकडे आहे याची कल्पना सर्वांना आहे. अमित शाह हे त्यावेळी हरियाणाला का गेले होते, असा सवाल सावंत यांनी केला. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाला होता. तुम्ही शब्द दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात न येता हरियाणाला गेले. पटक देंगे म्हणल्यानंतर मातोश्रीवर का आले होते? असेही सावंत म्हणाले. तुम्हाला पटकता आले नाही. त्यामुळे मातोश्रीवर आले. त्यावेळी ठाकरेंनी तुम्हाला विधानसभेबद्दल प्रश्न विचारले होते. त्यानंतर तुम्ही बोलला होतात. शब्द पलटणारी भाजप आहे, अशी टीका सावंत यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com