मुंबई : विरोधकांकडून नामर्द पणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आजारपणावर टीका केली जात आहे. विरोधकांच्या अंतरंगात किती कचरा आहे हे देखील स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर टीका करणारे नामर्द, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केली.
संजय राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मानेवरील शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सार्वजनीक कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावर बोलताना राऊत यांनी भाजपवर टिकेचे बाण सोडले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे राज्यात उत्साह आहे. विरोधकांना आता चपराक बसली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
राऊत म्हणाले, विरोधी पक्षांनी एकप्रकारची नामर्दानगी आणली आहे. मोठ्या मनाच्या राजकारणाचा विरोधी पक्षांकडून ऱ्हास होत आहे. नामर्दानही हा शब्द भाजपने आणला आहे, म्हणून मी तो शब्द वापरत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या प्रकारची होती हे सांगालया नको, असेही राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अभिवादन केले नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर टीका केली होती. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केले नाही, सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून नसता, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला होता. त्यावर राऊत यांनी जोरदार उत्तर दिले. राऊत म्हणाले, गांधी कुटुंबियांनी एक ट्विट केले नाही तर फडणवीसांना दुःख झाले. मग बाळासाहेबांना पद्म विभूषण पुरस्कार का दिला नाही. फडणवीसांनी आधी त्यावर बोलावे मग आम्ही ट्विटवर बोलू. तुमचे सरकार असताना पुरस्कार द्यावासा का नाही वाटला, असा सवाल राऊत यांनी केला. विर सावरकरांना पुरस्कार द्याल असे वाटले होते. वीर सावरकर भारतरत्न पासून उपेक्षित आहेत. जिवंत असताना टीका करायची आणि नंतर पुरस्कार द्यायचा, असा खेळ सध्या सुरु असल्याचेही राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.