Poonam Mahajan, Sanjay Raut
Poonam Mahajan, Sanjay RautSarkarnama

त्या सध्या कुठे आहेत? संतापलेल्या पूनम महाजनांना राऊतांनी दिलं उत्तर

संजय राऊत यांनी प्रमोद महाजन यांच्याबाबतचे एक व्यंगचित्र ट्विट केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
Published on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलेल्या व्यंगचित्रावरून वाद निर्माण झाला होता. या ट्विटवरून भाजपच्या खासदार व प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्या कन्या पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी राऊतांवर खरमरीत टीका केली. त्यानंतर राऊतांनी हे ट्विटच डिलीट केलं. महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊतांनी ते व्यंगचित्र मी काढलं नव्हतं, ते जिथं पोहोचवायचं होतं तिथपर्यंत पोहचलं आहे, असं म्हटलं आहे.

माध्यमांशी मंगळवारी बोलताना राऊत म्हणाले, मी प्रमोद महाजनांवर वैयक्तिक टीका केलेली नाही. ते व्यंगचित्रात बाळासाहेबांसमोर उभे राहिल्याचे दिसत आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीचा तो सुरूवातीचा काळ होता. भाजप नेत्यांनी शिवसेनेबाबत (Shiv Sena) केलेल्या वक्तव्यांमधील सत्य दाखवण्यासाठी व्यंगचित्र पोस्ट केलं होतं. हे व्यंगचित्र 35-40 वर्षांपुर्वीचं आहे. त्याचवेळी आक्षेप घ्यायला हवा होता. ते आजही उपलब्ध आहे. त्यावरून एवढं अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.

Poonam Mahajan, Sanjay Raut
पूनम महाजनांसमोर राऊतांची माघार; नामर्द म्हणताच 'ते' ट्विट केलं डिलीट

एवढ्यावरच न थांबता राऊतांनी पूनम महाजन सध्या कुठे आहेत मला माहिती नाही, असाही टोला लगावला. भाजपच्या वाढीत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर पर्रीकर यांचे मोठे योगदान राहिले आहे. पण त्यांची पुढची पुढची पुढे कुठे आहे, असा सवाल राऊतांनी केला. पूनम महाजन भाजपच्या खासदार आहेत, पण सध्या त्या कुठे आहेत, असं त्यांना विचारायंच आहे, असं राऊत म्हणाले. महाजन कुटुंबाशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगण्यासही राऊत विसरले नाहीत.

राऊतांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरही भाजपवर (BJP) पुन्हा टीका केली. ते म्हणाले, भाजपशी युतीचा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी उघडपणे पुरस्कार केला होता. भाजप नेत्यांनीच एकत्र निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांचा त्यात समावेश होता. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये, या उद्देशाने बाळासाहेबांनी त्यावेळी युती केली. पण त्याचा भाजपमधील नवहिंदुत्ववाद्यांना विसर पडला आहे. इतिहासाची फाडलेली पाने त्यांच्याकडे नाहीत. या नेत्यांना त्याची आठवण करून देत राहू, असे राऊत यांनी नमूद केलं.

Poonam Mahajan, Sanjay Raut
चित्रा वाघ म्हणतात, राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं...गिरे तो भी टांगे उपर!

राऊतांनी ट्विटमध्ये काय म्हटलं होतं?

राऊतांनी ट्विटमध्ये कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे...बघा नीट.. असं म्हटलं होतं. तसेच ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या व्यंगचित्रामध्ये बाळासाहेब ठाकरे हे एका खुर्चीवर बसल्याचे दिसते. तर त्यांचे पाय पुढील एका खुर्चीवर आहेत. त्यानंतर समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला ते हॅव अ सीट असं विचारत असल्याचे व्यंगचित्रावर लिहिण्यात आलं आहे. त्यांच्याच बाजूला एक छोटा स्टूल आहे. या व्यंगचित्रात बाळासाहेबांसमोरील व्यक्ती प्रमोद महाजन असल्याचे भाजपच्या खासदार व महाजनांच्या कन्या पूनम महाजन यांच्या ट्विटवरून स्पष्ट झाले.

पूनम महाजनांचा खरमरीत प्रत्युत्तर

राऊतांच्या या ट्विटवर पूनम महाजन चांगल्याचं संतापल्याचे दिसले. त्यांनी राऊतांना खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं. 'स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका,' असं या ट्विटमध्ये म्हटले आहे. पूनम यांचे हे ट्विट राऊतांच्या टांगले जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळे काही वेळानंतर राऊतांनी आपलं ट्विटच डिलीट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com