भाजपची साडेतीन लोकं तुरूंगात जाणार...शिवसेना लागली कामाला!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJPSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप (BJP) व शिवसेनेतील राजकीय संघर्ष आता टोकाला पोहचला आहे. नेत्यांना तुरूंगात पाठवण्याची भाषा दोन्ही पक्षांकडून नेतेमंडळी करत आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी मोठा गौप्यस्फोट केल्यानं खळबळ उडाली आहे. भाजपची साडेतीन लोकं कोठडी जाणार असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. त्यासाठी शिवसेनेकडून (Shiv Sena) तयारी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना भवनमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले जातील, असे संकेतही राऊत यांनी दिले आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे प्रमुख नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी पत्रकार परिषद होणार असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Shiv Sena, BJP
'योगी'च्या नादी लागल्या अन् शेअर बाजारात घेतले अनेक धक्कादायक निर्णय; 'सेबी'चा खुलासा

याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले जातील. संपूर्ण देश ऐकेल. आम्ही खूप सहन केलं. आता आम्हीच तुम्हाला बरबाद करू. त्यांची दादागिरी सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्र सरकारकडून शिवसेना, ठाकरे परिवारावर खोट्या आरोपांचा चिखल उडवला जात आहे. त्याला उद्या उत्तर मिळेल, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला.

अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) कोठडीत महाविकास आघाडीतील नेते जातील, अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. पण पुढील काही दिवसांत भाजपचे साडे तीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर येतील. महाराष्ट्रातही सरकार आहे, हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आहे, हेही लक्षात घ्या. सरकार हे सरकार असतं. कोणात किती दम आहे ते पाहू. त्यांचा बंदोबस्त सुरू आहे, असा इशारा राऊतांनी दिला.

Shiv Sena, BJP
सत्ता गेल्याने फडणवीस वैफल्य ग्रस्त; आदित्य ठाकरे प्रथमच आक्रमक

राजकारणात एक मर्यादा असते, ती मर्यादा संपली आहे. उद्या याबाबत सविस्तर सांगेन. सर्वांना माहिती आहे, मी काय बोलत आहे. त्यांची झोप उडाली आहे. केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांना घाबरणार नाही. काय उखडायचं ते उखडा, असंही राऊत म्हणाले. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आता ते साडे तीन लोकं कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे. राऊत यांनी साडे तीन असा उल्लेख नेमका कुणासाठी केला, यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com