...पर हम झुकेंगे नहीं! राऊत संतापले अन् विरोधकांना दिला 'पुष्पा' स्टाईल डोस

ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली असून राऊतांच्या दोन्ही मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही धाड टाकली आहे.
Sanjay Raut warns BJP after ED raids
Sanjay Raut warns BJP after ED raidsSarkarnama

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) निकटवर्तीयांवर सुरू असलेल्या कारवाईवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) भडकले आहेत. ईडीने प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना अटक केली असून राऊतांच्या दोन्ही मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या घरावरही धाड टाकली आहे. या कारवायांवरून राऊतांनी भाजपला (BJP) खुलं आव्हान दिलं आहे. धमकावूनही झुकलो नाही, आता केद्रीय यंत्रणा मागे लावल्या आहेत. पण तरीही झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

प्रवीण राऊत यांना नऊ फेब्रुवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सुजित पाटकर यांच्या घरी ईडीची शोधमोहिम सुरू असल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापुर्वीही राऊतांच्या पत्नीला ईडीकडून एका प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होते. राऊत यांनी गुरूवारी सकाळी ट्विट करून केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut warns BJP after ED raids)

Sanjay Raut warns BJP after ED raids
राऊतांच्या मुली अडचणीत? सुजित पाटकरांच्या घरावर ईडीची धाड

राऊतांनी हिंदीतून ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आधी अमिष दाखवलं गेलं, ऑफर्स दिल्या. त्यानंतर घाबरवलं. पण तरीही झुकलो नाही, मग कुटुंबाला धमकावलं गेलं. मी म्हटलं, सोडून द्या, त्याकडे डोळेझाक करा त्यांच्याकडे. तर आता केंद्रीय यंत्रणांना आमच्या मागे लावले. असं चालत राहतं. 2024 पर्यंत चालतच राहील. पण आम्ही झुकणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

राऊतांनी या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना टॅग केले आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी कवितेच्या दोन ओळी टाकत विरोधकांना इशारा दिला आहे. 'मैं तूफानों में चलने का आदी हूँ, तुम मत मेरी मंजिल आसान करो,' असं राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संजय राऊतांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातच पाटकर यांच्याकडेही ईडीने चौकशी सुरू केली आहे. याआधीही ईडीने त्यांची चौकशी केल्याचे समजते. पाटकर हे प्रवीण राऊत यांचेही सहकारी आहे. तसेच राऊतांच्या मुली पुर्वशी आणि विधिता यांच्या कंपनीतही ते भागीदार असल्याचे माहिती समोर आली आहे. राऊतांच्या मुली मॅगपी डीएफएस प्रा. लि. या कंपनीत मागील वर्षीपासून भागीदार आहेत. ईडीने मंगळवारीही पाटकर यांच्या मुंबईतील घरी छापा चौकशी केली होती. पाटकर हे प्रवीण राऊत यांच्या गुरूआशिष कन्स्ट्रक्शनशी संबंधित आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com