राऊतांच्या मुली अडचणीत? सुजित पाटकरांच्या घरावर ईडीची धाड

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना सक्त वसुली संचालनालयाने बुधवारी अटक केली आहे.
ED Raid
ED Raid Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) बुधवारी अटक केली आहे. त्यानंतर आता याच प्रकरणात ईडीने राऊतांच्या दोन्ही मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या घरावर धाड टाकली आहे. त्यांच्या घरी ईडीची शोधमोहिम सुरू असल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संजय राऊतांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातच पाटकर यांच्याकडेही ईडीने चौकशी सुरू केली आहे. याआधीही ईडीने त्यांची चौकशी केल्याचे समजते.

ED Raid
मोठी बातमी : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक

पाटकर हे प्रवीण राऊत यांचेही सहकारी आहे. तसेच राऊतांच्या मुली पुर्वशी (Purvashi Raut) आणि विधिता (Vidhita Raut) यांच्या कंपनीतही ते भागीदार असल्याचे माहिती समोर आली आहे. राऊतांच्या मुली मॅगपी डीएफएस प्रा. लि. या वाईनचे वितरण करणाऱ्या कंपनीत मागील वर्षीपासून भागीदार आहेत. ईडीने मंगळवारीही पाटकर यांच्या मुंबईतील घरी छापा चौकशी केली होती. पाटकर हे प्रवीण राऊत यांच्या गुरूआशिष कन्स्ट्रक्शनशी संबंधित आहेत.

ईडीकडून अलीबाग येथील जमिन व्यवहाराचीही चौकशी केली जात असल्याचे समजते. पत्राचाळ प्रकल्पात मिळालेल्या पैशातून ही जमीन खरेदी केली आहे किंवा नाही, याचा तपास केला जात आहे. या जमीन राऊतांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रवीण राऊत हे एचडीआयएलची (HDIL) सहाय्यक कंपनी असलेल्या गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक आहेत. गोरेगाव येथील जमीन विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली राऊत यांच्यावर ईडीकडून मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी सुरू होती.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होते. प्रवीण राऊत याआधीही चर्चेत आले होते. त्यांचं नाव पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात आलं होतं. त्यावेळी ईडीने त्यांच्याशी संबंधित 72 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. याच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com