Shiv Sena Political News : शिवसेनेच्या खासदारांवर अन्याय होणार नाही, 11 जणांना तिकीट मिळणार; शिरसाटांचे संकेत...

Shiv Sena Political News : आज संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे शिरसाट म्हणाले.
MLA Sanjay Shirsat
MLA Sanjay Shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुका जाहीर होऊन आता जवळपास 13 दिवस झाले. तरीही अद्याप युती आणि आघाडीकडून जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विद्यमान 13 खासदारांपैकी 5 ते 6 सहा जणांचे तिकीट कापले जाईल, अशी चर्चा केली जात होती. मात्र, आता शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी जवळपास 11 खासदारांना पुन्हा तिकीट दिले जाईल, असे संकेत दिले आहेत. (Lok Sabha Election 2024)

महायुतीच्या जागावाटपाबाबत वाद नाही. आम्हाला इच्छुक उमेदवारांची गर्दी याची चिंता आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे दोन वेळेला खासदार राहिलेले आहेत. ते तीन लाख मतांनी निवडून आलेले आहेत. अशा जागा शिवसेनेने सोडणे योग्य होणार नाही. आमच्यात वाद आहेत असे समजू नका, आमच्या 11 विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळू शकते. आज संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे शिरसाट म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटात बंडखोरी?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची (Shivsena) लोकसभेसाठीची (Lok Sabha Election 2024) यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण निर्णाण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज गुरुवारी (28 मार्च) आमदार गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे अनेक समर्थक हजर होते. गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं असून, शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com