Thane : नवी मुंबईतील ताई आणि दादा म्हणजे आमदार मंदाताई म्हात्रे आणि आमदार गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांच्यातील वाद सगळ्यांनाच परिचित आहे. बुधवारी ठाणे रेल्वे स्थानकावर ताई आणि दाद हे एकत्र येणार असल्याचं भाजप ( Bjp ) पक्षाकडून सांगण्यात आलं. पण, निमित्त ठरलं, मुंबईहून अयोध्याकडे रामभक्तांना घेऊन निघालेल्या आस्था स्पेशल रेल्वेचं... या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. त्यावेळी मान्यवरांमध्ये ताई आणि दादा यांची नावं प्रामुख्यानं नमूद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल रेल्वे उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन अयोध्येला ( Ayodhya ) रवाना होणार आहे. या रेल्वेला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार गीताताईन जैन, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि पदाधिकारी, कार्यकर्ते रात्री बुधवारी रात्री साडेदहा वाजता फलाट क्रमांक सातवर एकत्र येणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना रामल्ललाचे दर्शन घेता आलं नाही. अशातच प्रत्येक नागरिकाला राम मंदिराचे आकर्षण आहे. त्यामुळे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून अयोध्येसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा घाट घातला होता. पण, 31 जानेवारीला अयोध्येतील तापमान कमी असल्यानं हा दौरा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला.
त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना 7 फेब्रुवारीची वाट पाहावी लागली. ही रेल्वे 7 फेब्रुवारीला रात्री 10.30 वाजता ठाण्यातून अयोध्येकडे रवाना होणार आहे. 9 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 50 मिनिटांच्या दरम्यान अयोध्येला ही रेल्वे पोहचेल. तर, परतीचा प्रवास 10 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. 12 फेब्रुवारीला या रेल्वेचं ठाण्यात आगमन होईल. पण, आस्था रेल्वेच्या निमित्तानं मंदाताई म्हात्रे आणि गणेश नाईक एकत्र येत असल्यानं दोघांकडे सर्वांच्या नजरा लागून राहणार आहेत.
दादा अन् ताई नेमका वाद काय?
2021 साली बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी थेट आमदार नाईक यांच्या ऐरोली मतदारसंघातील नागरी समस्यांना हात घालत शिरकाव केला होता. त्यापूर्वी नाईकांनी बेलापूर मतदारसंघात येऊन विविध विकास कामांचे भूमिपूजन करून म्हात्रे यांना डिवचण्याचं काम केलं होतं.
तसेच, आमदार नाईकांविरोधात एका महिलेनं बलात्कार आणि धमकी दिल्याची तक्रार नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पण, ही तक्रार महिलेनं माघारी घेतली. आमदार मंदाताई म्हात्रे आणि विजय चौगुले यांच्यावर गणेश नाईकांविरोधात तक्रार करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप महिलेनं केला होता. त्यामुळे गणेश नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांच्यातील वैर समोर आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.