Sushma Andhare : "अमृता वहिनी आमच्या लाडक्या भावजय पण..."; सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीसांना टोला, नेमकं काय म्हणाल्या?

Sushma Andhare On Amruta Fadnavis : "एकनाथ शिंदेंना मुलगा श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून पुढे आणायचं आहे, तर ज्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि अजित पवार यांच्यापेक्षा जास्तीचा लाभ स्वत:च्या पदरात पाडून घेतला, त्या सुनील तटकरेंना त्यांची मुलगी आदिती यांना मुख्यमंत्री करायचं आहे."
Amruta Fadnavis, Sushma Andhare
Amruta Fadnavis, Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare On Amruta Fadnavis : "अमृता वहिनी या आमच्या लाडक्या भावजय आहेत. त्या कधी-कधी खरं बोलतात. त्या जे काही बोलल्या, ते एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यासंदर्भात बोलल्या आहेत", असं म्हणत शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, "अमृता वहिनी आमच्या लाडक्या भावजय आहेत. त्या कधी-कधी खरं बोलतात. एकनाथ शिंदेंना त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून पुढे आणायचं आहे, तर ज्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि अजित पवार यांच्यापेक्षा जास्तीचा लाभ स्वत:च्या पदरात पाडून घेतला.

त्या सुनील तटकरेंना त्यांची मुलगी आदिती यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस जे काही बोलल्या, ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), सुनील तटकरे यांच्यासंदर्भात बोलल्या", अशा शब्दात अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, यावेळी त्यांनी महायुती (Mahayuti) लोकाभिमुख नव्हे तर मताभिमुख काम करते अशी टीका कली. त्या म्हणाल्या, "महायुती काहीही करायला गेली की त्याच्या उलट होतं. सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी मोठा गाजावाजा लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला आणि दुसऱ्याच दिवशी बदलापूरची घटना घडली.

Amruta Fadnavis, Sushma Andhare
Pimpri News : पिंपरीत अजित पवारांना दुसरा धक्का; 'हा' नेता उतरणार विधानसभेच्या रिंगणात

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा कोसळला. अशा अनेक घटना घडत आहेत. कारण त्यांची काम करण्याची नियत चांगली नाही. ते लोकाभिमुख नव्हे तर मताभिमूक काम करतात. त्यामुळे के लोक अडचणीत येतात."

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. "माझं कुटुंब माझी जबाबदारी स्त्रिया म्हणू शकतात, पण माझं कुटुंबच माझी जबाबदारी असं एक मोठे नेते म्हणतात, तेव्हा अडचण आहे.

Amruta Fadnavis, Sushma Andhare
Devendra Fadnavis : 'विरोधक अमेरिकेत जाऊन देखील उद्घाटन करतील' ; देवेंद्र फडणवीसांचा टोला!

पण देवेंद्र फडणवीस असं कधीच म्हणत नाहीत. त्यांनी संपूर्ण महिला, शेतकरी, मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी ते 24 तास काम करतात त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. कोणी असा नेता निवडून येणार नाही ज्यांना आपले घर भरायचे आहे आणि आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे. असे लोक तुमच्या मदतीला येणार नाहीत", अशा शब्दात त्यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर सुषमा अधारे यांनी हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com