Shivsena UBT Candidate List : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिली चार महिलांना संधी

Uddhav Thackeray Shivsena Candidate List: उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पहिल्या यादीत चार महिला उमेदवारांना संधी दिली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आघाडी घेत 62 उमेदवाराची यादी जाहीर केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पहिल्या यादीत चार महिला उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून बुधवारी जाहीर केलेल्या यादीत विद्यमान 16 आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्यासोबतच चार महिला रणरागिनींना मैदानात उतरवले आहे.

शिवसेना (Shivsena) पक्षाकडून पाचोरा मतदारसंघातून वैशाली सूर्यवंशी, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, कुर्ला मतदारसंघातून प्रविणा मोळाजकर, महाडमधून स्नेहल जगताप यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Sunil Tingre News : माझी उमेदवारी फिक्स, मला...; पहिल्या यादीत पत्ता कट, तरीही टिंगरेंचा कॉन्फिडन्स कायम

विशेषतः मुंबईतील 13 मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिले आहे.

मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

बुधवारी मातोश्रीवर मोठी गर्दी पहावयास मिळत होती. त्यावेळी काही पक्षप्रवेश देखील पार पडले, त्यांना देखील उमेदवारी मिळाली. सहमतीने काही जागांवर आम्ही उमेदवार दिले आहेत, असे सांगितले जात आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com