Basavaraj Bommai : वाद मिटवायचा की पेटवायचा ? ; बोम्मईंना शिवसेनेचा इशारा

Maharashtra karnataka border dispute : तो अधिकार घटनेनेच दिला आहे, हे बोम्मई यांनी विसरू नये.
Basavaraj Bommai
Basavaraj Bommaisarkarnama
Published on
Updated on

Maharashtra karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीतील जतमधल्या गावांवर हक्क सांगितल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य केलं आहे. बसवराज बोम्मई यांच्यावर अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

कर्नाटकची एक इंचही जमीन देणार नाही असे बोम्मई यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रालाही कर्नाटकची इंचभरही जमीन नकोच आहे. महाराष्ट्राला त्यांच्या हक्काचा बेळगावसह सीमा भाग हवा आहे व त्यासाठी लोकशाही तसेच कायदेशीर मार्गाने लढा सुरू आहे. महाराष्ट्राने संयम राखला आहे व तीच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे, असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

Basavaraj Bommai
Jayakumar Gore : मोठी बातमी ; आमदार जयकुमार गोरे अपघातात जखमी

महाराष्ट्राच्या विधानसभेत थातूरमातूर विषयांवर खोके सरकार नंगानाच करीत आहे आणि तिकडे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात निषेधाचाच ठराव मंजूर करून चपराक लावली आहे, हे समजत नसेल तर निर्लज्जपणाची हद्दच झाली ! बोम्मई यांनी एक सांगावे, त्यांना हा वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे ? त्यावर महाराष्ट्र आपली भूमिका ठरवेल!, असा रोखठोक सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

कानडी प्रदेश, कानडी जनता, कानडी भाषा, कानडी संस्कृती, कला याबाबत महाराष्ट्राला प्रेम व अभिमान कायम आहे. किंबहुना कानडी ही मराठीची भाषाभगिनीच आहे. मराठी-कानडी भाषिक जनतेत अत्यंत प्रेमाचा संवाद आहे. त्यात मिठाचा खडा टाकून वातावरण नासविण्याचे उद्योग नेमके कोण करीत आहे?

कर्नाटकात बेळगावसह सीमा भाग अन्याय्य पद्धतीने घातला गेला आहे. यावर फायद्याने बोलण्यापेक्षा आधी कायद्याने व मग माणुसकीच्या नात्याने बोलले पाहिजे. कानडी भाषा व संस्कृतीचे रक्षण करण्याचा जितका अधिकार तुम्हाला आहे तितकाच आपली भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार सीमा भागातील मराठी भाषिकांनादेखील आहे व त्यांना तो अधिकार घटनेनेच दिला आहे, हे बोम्मई यांनी विसरू नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com