Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama

Priyanka Chaturvedi: चतुर्वेदी यांची श्रीकांत शिंदेंवरील टीका शिंदे गटाच्या जिव्हारी; ठाण्यात पडसाद, 'दावोसची गुलाबो' म्हणत...

Priyanka Chaturvedi News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याविरोधात शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे.

Priyanka Chaturvedi Vs Shinde Group: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र तथा कल्याणचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याविरोधात शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे.

ठाण्यात शिंदे गटाच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांच्या बॅनरला जोडो मारो आंदोलन केले. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बॅनवर 'दावोसची गुलाबो' असा उल्लेख करून तो बॅनर पायदळी तुडवत त्यावर जोडे मारले आणि तो बॅनर फाडून जाहीर निषेध नोंदवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना (Shivsena) ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर हे आंदोलन आज (शुक्रवारी) करण्यात आले. यावेळी संतप्त महिला आघाडीने चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्याविरोधात घोषणाबाजी करत, त्यांचा दावोसची गुलाबो, असा उल्लेख केला. याप्रसंगी मोठया संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना, मीनाक्षी शिंदे यांनी खासदारांना किमान वडील आहेत. पण, तुझे किती वडील झाले हे आता तुला सांगण्याची वेळ आली आहे. अनेक पक्ष बदलून निष्ठेची बाता करण्यासाठी असे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. हेच त्यांचे दुर्भाग्य आहे. तसेच उबाठाकडे लोकसभा किंवा आगामी निवडणुकीसाठी व्हिजन नाही, विकासाची कामे नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे भाड्याने आणलेल्या माणसांकडून ते अशी वक्तव्य करुन घेत आहेत असंही शिंदे म्हणाल्या.

Priyanka Chaturvedi
Sushama Andhare News : ठाकरे गटाची मोठी खेळी; करंजकर यांच्या दारात सुषमा अंधारे धडाडणार!

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रियंका चतुर्वेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, "एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? गद्दार गद्दारच राहणार", याच सभेत त्या पुढे म्हणाल्या "माझे वडील गद्दार आहेत, हे श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलं आहे" असं वादग्रस्त वक्तव्य चतुर्वेदी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता शिंदे गट आक्रमक झाला आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com