Sushama Andhare News : ठाकरे गटाची मोठी खेळी; करंजकर यांच्या दारात सुषमा अंधारे धडाडणार!

Nashik Loksabha Election 2024 : सुषमा अंधारे शिंदे गटात गेलेल्या विजय करंजकर यांच्या गावात जाऊन हिशेब मांडणार
Sushama Andhare
Sushma Andhare Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: उमेदवारी नाकारल्याने भगूर चे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर शिंदे गटात गेले. शिंदे गटाच्या या खेळीला उद्धव ठाकरे गटाने मोठी खेळी करत डाव उलटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघातील प्रचारात आता रंग भरण्यास सुरुवात होईल.

महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली आहे. आता ही आघाडी टिकवून ठेवण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. तिसरे टप्प्यातील मतदान संपल्यानंतर महायुतीचे अनेक नेते नाशिकमध्ये घडणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आता आपल्या प्रभावक्षेत्राला मजबूत करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Sushama Andhare
Vishwajeet Kadam News : 'सांगलीत कदम हे पाटलांच्या पाठीमागे; पण कुठल्या ? हे 4 जूनला कळेल'

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी उमेदवारी नाकारल्याने पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यांनी विविध पक्षांची चर्चा करीत उमेदवारीसाठी प्रयत्न केले. हे प्रयत्न अयशस्वी झाले. शेवटी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्यावर अन्याय झाला असून ठाकरे गटात निष्ठावंतांना किंमत नाही, असा आरोप करून ठाकरे गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील ठाकरे गटावर प्रचंड आरोप केले होते. या सगळ्यांना उत्तर देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.

ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आता थेट विजय करंजकर यांच्या गावात जाऊन त्यांचा हिशोब चुकता करणार आहेत. येत्या रविवारी त्यांची भगूर येथे जाहीर सभा होणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार प्रयत्न केले आहे. उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि विजय करंजकर यांचा हा बालेकिल्ला असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे सुषमा अंधारे हा बालेकिल्ला किती ढासळतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीकडून जाहीर सभांचा धडाका होणार आहे यामध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची उद्या सातपूर आणि मध्य नाशिक येथे दोन सभा होत आहेत १४ मेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार इमरान प्रतापगढी यांची तर १५ मे रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sushama Andhare
Lok Sabha Election 2024 : निवडणूक विभागाच्या पथकाची पुन्हा धडक कारवाई; पकडली तब्बल लाखो रुपयांची रोकड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com