Bhau Chaudhary : नाशिक लोकसभेसाठी आता शिवसेनेच्या भाऊ चौधरींचं नावही आलं चर्चेत!

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी महायुतीत बैठका सुरू आहे.
Bhau Chaudhary
Bhau ChaudharySarkarnama

Loksabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, विजय करंजकर यांच्यानंतर आता डोंबिवलीचे रहिवाशी व शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्रचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे नाव नव्याने चर्चेत आले आहे.

नाशिकच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी महायुतीत बैठका सुरू आहे. हेमंत गोडसे व छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असले तरी त्या दोघांविषयी नाराज असल्यामुळे पर्यायी उमेदवाराचा शोध युतीकडून घेतला जात आहे भाजपचे आमदार राहुल ढिकले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे नाव देखील आता पुढे येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhau Chaudhary
Hemant Godse News : अजय बोरस्तेंनी गाठलं ठाणं तर गोडसेंनी कल्याण..! श्रीकांत शिंदेंकडे लावणार फिल्डिंग ?

नाशिक लोकसभेची उमेदवारीचा तिढा अद्याप कायम आहे. सध्याचे शिवसेनेचे खासदर हेमंत गोडसे यांना तिकीट मिळेल की नाही ही शाश्वती नसल्याने त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण मध्ये भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातच अजय बोरस्ते,विजय करंजकर आणि भाऊसाहेब चौधरी या तीन नावांची चर्चा नाशिक लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवारीकरता सुरू झाली आहे.

याबाबत डोंबिवलीचे रहिवासी, शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्रचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्र एकमेव सीट ही शिवसेनेकडे आहे. या लोकसभेमध्ये शिवसेना सातत्याने निवडणूक लढते या दोन्ही वेळी शिवसेनेचे हेमंत गोडसे हे निवडून आले आहेत आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. साहजिकच आहे दोन टर्म निवडून आलेले खासदार त्या ठिकाणी पुन्हा इच्छुक असणं आणि उमेदवारी मिळणे स्वाभाविक आहे ते प्रयत्न करत आहेत.

Bhau Chaudhary
Lok Sabha Election 2024|...म्हणून नाशिकसाठी आमचा हट्ट; फडणवीस, अजितदादांनी समजून घ्यावं; शिवसेना ठाम!

नाशिकच्या जागेचा तिढा सुटला पाहिजे आणि एक दोन दिवसांमध्ये नाशिकचा जागेचा प्रश्न मार्गी लागेल. शिवसेनाच त्या ठिकाणी धनुष्यबाणावर लढेल. नाशिकच्या जागेवर आमच्यासाठी उमेदवार कोण आहे महत्त्वाच नाही. धनुष्यबाण चिन्हावरती लढणं आणि धनुष्यबाण विजय होणे आणि महायुतीला एक खासदार होणं महत्त्वाच आहे.

परंतु आमची प्रामाणिक इच्छा आहे की उत्तर महाराष्ट्रची ही एकमेव जागा शिवसेनेकडे आहे आणि ती शिवसेनेकडेच राहिली पाहिजे. आमची निशाणी धनुष्यबाण आहे.उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं नाही धनुष्यबाण महत्त्वाचा आहे आणि धनुष्यबाण त्या ठिकाणी विजय झाला पाहिजे असे चौधरी म्हणाले.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com