Hemant Godse News : अजय बोरस्तेंनी गाठलं ठाणं तर गोडसेंनी कल्याण..! श्रीकांत शिंदेंकडे लावणार फिल्डिंग ?

Nashik Loksabha Election 2024 : नाशिक लोकसभेवरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात खासदार हेमंत गोडसे यांच्या नावासोबतच अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आहे
Hemant Godse
Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

शर्मिला वाळुंज

Kalyan Dombivali News: महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे. नाशिकमध्ये शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे. पण या जागेवर शिंदे गटाचा दावा कायम असला तरी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचं नाव पुढं आलं आहे.अशातच आता भाजपनेही या मतदारसंघासाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे.मात्र, या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर आता नाशिक मतदारसंघाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे.

नाशिक लोकसभेवरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात खासदार हेमंत गोडसे यांच्या नावासोबतच अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आहे.अजय बोरस्ते यांनी ठाणे येथे चैत्र नवरात्रोत्सव निमित्त ठाण्यात आले होते. त्या पाठोपाठ आता हेमंत गोडसे यांनी देखील कल्याणमध्ये येऊन श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे नाशिकच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सुटावा जेणेकरून उमेदवार आपल्या प्रचारात लागतील अशी विनंती आहे त्यांना करणार असल्याचे यावेळी गोडसे यांनी सांगितले.

Hemant Godse
Beed Lok Sabha News : बीडमधून ओबीसी बहुजन पार्टीची उमेदवारी यशवंत गायकेंना; फटका कोणाला ?

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत हेमंत गोडसे व छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र या दोघांच्या नावाची नाराजी असल्यामुळे महायुतीकडून पर्यायी उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. महायुतीकडून भाजपचे आमदार राहुल ढिकले आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली आहे. बोरस्ते यांनी ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सव निमित्त ठाण्यात हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले. मंदिरात आल्यानंतर देवाचे दर्शन झाले पाहिजे. तसेच ठाण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नाही असे होणार नाही. असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ आता हेमंत गोडसे देखील ठाण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री कल्याण येथे येत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मीडियाशी बोलताना गोडसे म्हणाले, महाविकास आघाडीचे जसे उमेदवार जाहीर झाले आहेत. तसेच महायुतीच्या ज्या उर्वरित जागा राहिल्या आहेत त्यावर लवकर तोडगा निघाला तर ते उमेदवार देखील प्रचाराला सुरुवात करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीचा उमेदवार प्रचारात मागे पडायला नको म्हणून लवकरात लवकर यावर निर्णय झाला पाहिजे असे वाटते. जागा वाटपाचा निर्णय जरी शेवटच्या टप्प्यामध्ये असला तरी, आता संपूर्ण राज्यभरामध्ये निवडणुकीचे वारे अतिशय वेगाने वाहू लागलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर निर्णय व्हावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत असे सांगितले.

शिवसेनेकडून बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे, ते ठाण्यात देखील आलेले आहेत यावर हेमंत गोडसे (Hemant Godse) म्हणाले,मला वाटतं अद्याप जागा कोणाला सोडायची हाच तिढा सुटलेला नाही. परंतु हा जागेचा तिढा लवकरात लवकर सुटून जागावाटप निश्चित व्हावं. त्यानंतर उमेदवार देण्याचं काम होईल. पक्षातील मुख्य नेते वरिष्ठ त्या ठिकाणी करतील. मुख्यमंत्री तसेच आमचे सहकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहोत. ते देखील या संदर्भात चर्चा करणार आहेत.

या संदर्भात आमच्या पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील. अजय बोरस्ते यांनी देखील प्रसार माध्यमांना सांगितल आहे की, ती जागा शिवसेनेला सुटावी यासाठी आग्रही आहोत. आणि त्यानंतर हेमंत गोडसे यांच्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत असेही सांगितले आहे.

Hemant Godse
Satara NCP News : संघर्षाच्या काळात शरद पवार गटात 'नाराजीनाट्य'; सुनील माने वेगळी भूमिका घेणार...?

छगन भुजबळ यांच्याविषयी गोडसे म्हणाले, तसा काही प्रश्न उद्भवत नाही. निवडणुका शेवटच्या टप्प्यात असल्याकारणाने ही सर्व अडचणी आहेत. संपूर्ण राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. म्हणून प्रत्येकाला उत्कंठा लागली आहे की, आपल्याही जागेवर निर्णय व्हावा. लवकरात लवकर महाविकास आघाडीचे जसे उमेदवार जाहीर झाले. तसेच महायुतीच्या ज्या उर्वरित जागा राहिल्या आहेत त्यावर लवकर तोडगा निघाला तर ते देखील प्रचाराला सुरुवात करतील असे गोडसे म्हणाले. खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde आणि हेमंत गोडसे यांच्याभेटीनंतर नाशिकच्या जागेवर नक्की काय तोडगा निघतो हे आता पहावे लागेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Hemant Godse
Lok Sabha Election 2024 : 'या' 11 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात; तीन ठिकाणी अद्याप 'वेट अँड वॉच'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com