Shivsena MLA Disqualification Case : १६ आमदारांची अपात्रता; नार्वेकरांना करावा लागणार सहा हजार पानांचा अभ्यास

Rahul Narwekar And Shivsena UBT : अभ्यास आणि विश्लेषण करून निकाल देण्यासाठी आणखी वेळ लागणार
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांनी प्रतिज्ञापत्रांद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सहा हजार पानांचे उत्तर सादर केले आहे. आता या पानांचा अभ्यास करून नार्वेकर निकाल देणार आहेत. या प्रक्रियेला आता किती कालावधी लागणार, याबाबत कुणालाही काही ठोस माहिती सांगत येत नसल्याने आणखी वाट पाहण्याशिवाय ठाकरे गटाकडे दुसरा पर्याय नसल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. दरम्यान, आता शिंदे गटाकडून उत्तर आल्याने नार्वेकर काय निकाल देणार, याकडे राज्यासह देशात उत्सुकता आहे. (Latest Political News)

शिवसेनेतील बंडानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. निकाल देताना यावर कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा असल्याचे न्यायालयाने सांगितले. अध्यक्षांनी या प्रकरणी विहित वेळेत निकाले देणे अपेक्षित असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र ठोस असा कालावधी न दिल्याने गेल्या साडेतीन महिन्यांपासून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता ठाकरे गटाच्या निशाण्यावर असलेल्या बंडखोर १६ आमदारांनी तब्बल सहा हजार पानांचे उत्तर सादर केले आहे. त्यांनी हे उत्तर सामूहिकपणे दिले की स्वतंत्रपणे, याबाबत माहिती मिळाली नाही.

Rahul Narwekar
MLA Europe Tour : राज्यातील सर्वपक्षीय २२ आमदार युरोपला जाणार; स्त्री सक्षमीकरणाचा अभ्यास करणार !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विहित वेळेत म्हणजे तीन महिन्यात निकाल देणे गरजेचे असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार ही मुदत १० ऑगस्ट रोजीच संपल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकरणी उत्तर देण्यासाठी मला वेळेचे बंधन नसल्याचा दावाही नार्वेकरांनी केला होता. तसेच या प्रकरणी अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. आता त्या आमदारांनी आपले म्हणणे सहा हजार पानांत दिले असून या उत्तराचे विश्लेषण, अभ्यासासाठी आता नार्वेकरांना आणखी कालावधी लागणार आहे.

Rahul Narwekar
Chhagan Bhujbal News : भुजबळ भाजपची अडचण वाढवणार...,मंत्रीपद धोक्यात ? वादग्रस्त विधान भोवणार..

एकीकडे ठाकरेंनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटीसीला मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांनी उत्तर दिले आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही ठाकरेंच्या आमदारांवर अपात्रता कारवाईची नोटीस बजावलेली आहे. त्याचेही लवकरात लवकर उत्तर येणे अपेक्षित आहे. आमदार अपात्रतेच्या निकालाचा हा पेच सोडवण्यासाठी राहुल नार्वेकरांना आणखी जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. आता वर्ष-सव्वावर्षावर आलेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी तरी या प्रकरणाचा निकाल येणार का, असा प्रश्न मात्र राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com