'शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण रस्ता बदलतात'

Sanjay Raut | Eknath Shinde : संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.
sajay raut, Narendra Modi
sajay raut, Narendra Modisarkarnama

Sanjay Raut : "शिवसेना म्हटलं की मोदी, (Narendra Modi) शहा (Amit Shah) पण रस्ता बदलतात. यांच्या नादी लागू नका म्हणतात. हा बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) शिवसैनिक आहे. यांच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडली तर हा झेंडा खिशात ठेवेलं आणि दांडा बाहेर काढेल अशी ही शिवसेना आहे," अश्या शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोरी केलेले शिनसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला. ते दहिसर येथील शिवसेनेच्या (Shivsena) मेळाव्यात बोलत होते. (sajay raut, Narendra Modi Latest News)

sajay raut, Narendra Modi
एकनाथ शिंदेंच्या बंडात राज्यपालांची एन्ट्री; ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल?

शिवसेना या चार आक्षराने राष्ट्रीय नेता म्हणून ओळख आहे. आम्हाला पाहिलं की मोदी आणी शहा पण रस्ता बदलतात आणि म्हणतात की, याच्या नादाला लागू नका हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. यांच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडली तर हा झेंडा खिशात ठेवेलं आणि दांडा बाहेर काढेल, अशी आपली ओळख आहे. कुणाची आमच्या दंडाला हात लावायची हिंमत नाही. तुम्ही तो व्हिडिओ पहा, असे म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.

sajay raut, Narendra Modi
हे घ्या, उदय सामंत यांचे तिकीट ; सुरतवरून गुवाहाटीकडे विमानाने रवाना..

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेत यायचं सरक्षण घ्यायचं प्रॅापर्टी कमवायच्या आणि त्याच पैशातून शिवसेनेवर वार केला जात आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे की, ही घाण आता पुन्हा शिवसेनेत घेऊ नका. कितीवेळ सहन करायचे. हे बाहेरून येतात आणि आम्हाला शिवसेना शिकवतात. अब्दूल सत्तारांच काय हिंदुत्व धोक्यात आलं? पण त्यांना कळेल की बिर्याणीची शितं कशी दातात अडकतात ते, असा सत्तारांना इशाराही राऊतांनी दिला. तर एका बापाचे असाल आणि शिवसेनेसोबत लढण्याची ताकद असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा, असे थेट आवाहनही त्यांनी बंडखोरांना दिले.

sajay raut, Narendra Modi
सत्तासंघर्षाच्या लढाईत रश्मी ठाकरे यशस्वी होणार का?

दरम्यान, काहींना महाराष्ट्र तीन भागात करायचा आहे. याला शिवसेना प्राणपणाने विरोध करेल म्हणून त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना 56 वर्षे चिरतरूण असून शिवसेनेला मरण नाही. आम्ही हे विष अनेकदा पचवलं. आता तुमच्यावर वेळ आहे विष खाऊन मरण्याची, अशी खोचक टीकाही त्यांनी बंडखोर आणि भाजपवर केली. तर शिंदे म्हणजे ठाणे नाही. शिवसेना घराघरात-मनामनात आहे. बाळासाहेब लोकांच्या मेंदूत आहेत. ज्याने ठाकरेंशी गद्दारी केली तो संपला. ज्याने बाळासाहेबांचे शाप घेतले तो संपला एवढ लक्षात ठेवा, अश्या शब्दात राऊतांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com